नांदेड - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा अर्धजल समाधी आंदोलनाचा इशारा 

शिवचरण वावळे
Saturday, 26 September 2020

घटनेत तरतूद असतानाही गेल्या ७० वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजा पाठोपाठ धनगर समाजाने देखील चांगलेच मनावर घेतले आहे. राज्य शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास धनगर समात रस्त्याव उतरणात असल्याचे निश्‍चित झाले आहे. यासाठी शुक्रवारी नांदेडात धनगर ॲक्शन समिचीती विभागीय बैठक संपन्न झाली यात धनगर मुख्य समन्वयक लहुजी शेवाळे यांच्यासह अनेकांनी यात सहभाग घेत आंदोलना विषयी सविस्तर चर्चा केल्याचे समजते

 

नांदेड - धनगर समाजाची ७० वर्षापासूनची आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. मल्हार सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ता. दोन आक्टोबरला धनगर समाज अर्धजल समाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी सेवाळे यांनी दिला. 

धनगर समाज आरक्षण ॲक्शन कमेटीची राज्यव्यापी बैठक शुक्रवारी (ता. २५) नांदेड येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. शेवाळे यांनी माहिती दिली. यावेळी विठ्ठल रबदडे, रंजना बोरसे, नंदकिशोर गोरे, मारोती चिंतले, शंकर शेळके, श्रीमती मंगला, श्रीमती शिवकांता, काशिनाथ आरगडे आणि व्यंकट मोळके यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- नांदेड : लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ​

७० वर्षाच्या काळात सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेले नाही. 

श्री शेवाळे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली ती स्वागतार्ह आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने सरकारची झोप उडाली आहे. परंतू घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला ‘एसटी’ चे आरक्षण देण्यासाठी घटनेत तरतूद केली असताना देखील गेल्या ७० वर्षाच्या काळात सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेले नाही. 

हेही वाचा- नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर

सरकारचे धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष 

धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही. ता. दोन आक्टोबरला गावा असो वा शहर जिथे नदी आहे तिथे धनगर समाज बांधव अर्धजल समाधी आंदोलन करणार आहेत. दुसऱ्या टप्यात ता. २२ आक्टोंबरला जालना ते औरंगाबाद मानवी साखळी आंदोलन आणि तिसऱ्या टप्यात धनगर समाज जेल भरो आंदोलन करणार असल्याचे श्री शेवाळे म्हणाले. इतके करुन देखील सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असेल तर ता. २६ जानेवारी २०२१ ला सरकार विरोधात अंतिम लढाईचे आंदोलन करु, असे धनगर समाज आरक्षण ॲक्शन कमेटीचे मुख्य समन्वयक लहुजी शेवाळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Dhangar Samaj's Ardhajal Samadhi agitation warns for reservation Nanded News