esakal | नांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोमवारी (ता. नऊ) बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यात पात्र ठरलेल्या 82 संस्था प्रतिनिधींच्या नावाची भर पडली आहे. प्रारुप मतदार यादीत संस्था प्रतिनिधींची संख्या 858 वरुन आता  940 झाली आहे. 

नांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीवर आक्षेपांचा भडीमार झाल्यानंतर त्यावर झालेली सुनावणीही गाजली होती. विशेष म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याही नावाला आक्षेप घेतला होता. या प्रक्रियेनंतर संस्था प्रतिनिधींची मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची धावपळ सुरु असताना सोमवारी (ता. नऊ) बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यात पात्र ठरलेल्या 82 संस्था प्रतिनिधींच्या नावाची भर पडली आहे. प्रारुप मतदार यादीत संस्था प्रतिनिधींची संख्या 858 वरुन आता  940 झाली आहे. 

सुनावणीच्या वेळेस थकबाकीदार सेवा सोसायट्यांनी संस्था प्रतिनिधी म्हणून ज्यांना पाठवले त्यांनी संस्थेचे थकीत रक्कम भरल्याने त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. दरम्यान काही सेवा सोसायटी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुढे त्यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता असल्याने अंतिम मतदाराचा आकडा वाढू शकतो असे सांगण्यात आले.

हेही वाचाधर्माबादमध्ये मोबाईलद्वारे मटका घेणाऱ्यास अटक; बुकीमालक व्यंकट सुरळीकर फरार

जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीला अंतिम स्वरुप प्राप्त होण्यापूर्वी अनेक अपात्र किंवा फक्त बाकी दार सेवा सोसायट्यांनी उच्च न्यायालय घातले असले तरी सहकार सहनिबंधक यांनी मतदान यादी अंतिम करुन या यादीला प्रसिद्धी दिली आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये सभासदांची वाढ झाली असून अंतिम मतदार यादी त्या सभासदांच्या नावाचा समावेश करण्यात आली आहे. ज्यांनी थकित रक्कम भरली किंवा ज्यांच्याविरुद्ध आलेले आक्षेप फेटाळण्यात आले. अशा सभासदांचे नाव अंतिम मतदार यादीत झळकले आहे.

सर्वाधिक मतदारांची वाढीव नोंद संख्या संस्था मतदार संघात झाली आहे. अ. मतदार संघात तब्बल 77 सभासद वाढले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास अर्धापुर, उमरी, देगलूर, लोहा आणि मुदखेड तालुक्यातून प्रत्येकी एका मतदारांची वाढ झाली आहे, कंधार तालुक्यात चार, नायगाव- 14, बिलोली माहूर- 15 ,मुखेड तीन, हदगाव तालुक्यात दोन सभासद मतदारांची वाढ झाली. सभासदांची नावे ब. मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संघात तब्बल 77 सभासदांची भर पडली आहे. या मतदारसंघात 504 सभासद होते. आता ही संख्या 581 वर पोहोचली आहे. ब. मतदारसंघात पूर्वी 150 सभासद होते त्यात तीन सभासदाची भर पडल्याने ही संख्या 153 झाली आहे. क. मतदार संघात 204 सभासद मतदार होते त्यात दोनने वाढ झाली असून अंतिम यादीत मतदारांची संख्या 206 झाली आहे. एकंदर प्रारुप मतदार यादी नुसार 858 सभासद होते पण त्यात आता भर पडल्याने मतदारांची संख्या 940 झाली आहे. आणखी न्यायालयात दिलेल्या संस्थांच्या बाजूने निर्णय लागल्यास मतदार यादीत मतदारांची नावे वाढणार आहेत.

loading image
go to top