एकट्या माहूरमुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजकीय गणित धोक्यात!

file photo
file photo

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक केवळ काही तासांवर येऊन ठेपली असताना देशमुख, पाटील, नवे वतनदार, वादात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या निष्ठा बासनात बांधून ठेवल्याने कोण निवडून येईल ही बाब करोडोचा सट्टा खेळणारे राजकारण्यांचे पडड्या आडचे सूत्रधार पण आज घडीस निकाल कसे लागतील हे सांगू शकणार नाही. असे चित्र आज तरी निर्माण झाले आहे 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा संचालक पदासाठी माहूर किनवट तालुक्यातील दोन्ही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नैतिक अधिकार असताना जिल्ह्याच्या काँगेस पक्षाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पाठीत राजकीय खंजर खुपसण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू आहे.नांदेड काँग्रेस ने माहूर काँग्रेसच्या बालहट्टा पुढे नांगी टाकून माहूर येथील जागेवर मैत्री पूर्ण लढत म्हणत राष्ट्रवादी पक्षावर निवडणूक लादली आहे. प्रत्येक्षात मात्र माहूर काँग्रेस चे सर्वेसर्वा केशवे कुटुंबियाकडून मतदारांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा बडगा दाखवून शिवाजीनगर ऐवजी वसंतनगरला भुल देऊन नेत असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची राजकीय दरी वाढवून किनवटचे ४४ व माहूरचे २० असे ६४ मतात माहूरच्या जागेस धोका झाल्यास जिल्हास्तरावरील पाच जागा पैकी तीन काँग्रेसी जागाना धोका होईल असा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी दिल्यामुळे केशवे पुत्राच्या एका जागेसाठी ३ जागेवर पाणी सोडण्यास पालकमंत्री तय्यार होतील का हा यक्ष प्रश्न आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा हनुमान व संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार प्रदीप नाईक हे मागील काळात काँग्रेसचे राम अशोक रावाच्या मागे राहून जिवाच्या आकाताने त्यांच्या आघाडीशी एकनिष्ठ होते. परंतु आज मिथिस काँग्रेस माहूर तालुक्यात एका घरघुती कंपनीत रूपांतर होऊन वरून हेलिकॉप्टर असा नारा असला तरी आतूनचा नारा त्यांचे सल्लागार आमदार अमर राजूरकर माहूरला येऊन राष्ट्रवादीचा पाहुणचार घेत आपल्या चाणक्य नीतीने मुख मे राम बगल मे छुरी चा अनुभव आणून देत आहेत. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इरेला पेटला असून काँग्रेसने अपक्षाचा नाद मना पासून सोडला नाही तर मात्र खा. प्रताप पाटलांचे राजकीय प्रताप आगामी काळात आघाडीत बिघाड आणल्यास नवल वाटायचे कारण नाही. अजून हि वेळ गेली नसून आज रात्रीच्या कत्तल की रातमध्ये अशोकरावानी तीन जागा वाचविण्यासाठी एका जागेचा बळी द्यावा असा सल्ला महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील प्रथम लाईनमधिल नेत्यांनी द्यावा अन्यथा संभाव्य राष्ट्रपती राजवटी नंतर राष्ट्रवादीचा निवडून येऊ शकणारा हुकमी एक्का माजी आ. प्रदीप नाईक अशोक चव्हानाच्या हातातून निघून गेल्यास देशमुखाचा बाबा ही जाईल पाटलांचा नाना ही जाईल व हाती नव्या अर्धवट वतनदारांचा परावलंबी बाळ्या हत्ती येऊन खा. प्रताप पाटलाना आयती संधी चालून येईल हे विसरून चालणार नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com