नांदेड जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी, १०१.८२ टक्के नोंद

नांदेड - मुखेड तालुक्यात शेतात पाणी गेल्याने पिके आडवी झाली आहेत.
नांदेड - मुखेड तालुक्यात शेतात पाणी गेल्याने पिके आडवी झाली आहेत.

नांदेड - दोन दिवस मंदावलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २५) पुन्हा नांदेड जिल्ह्याला झोडपून काढले. हा पाऊस मुखेड, कंधार, हदगाव, देगलूर, नायगाव तालुक्यात जोरदार झाला. यामुळे नायगाव तालुक्यासह सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५.१० मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात पावसाने चार महिन्याची सरासरी ओलांढत जिल्ह्यात ८०३.६० मिलीमीटरनुसार १०१.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

नांदेडमध्ये मागील पंधरा दिवसापासून पावसाने मुक्काम केला आहे. या काळात अनेक मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. तसेच जिल्ह्यातील गोदावरी, आसणा, लेंडी, कयाधू, पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीकाढच्या हजारो हेक्टरवरील खरिप पिकांचा घास घेतला आहे. यासोबतच अतिवृष्टी झालेल्या भागात शेतात पाणी साचून ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

सहा महसूल मंडळात अतिवृष्टी
मागील दोन दिवस काहीसा मंदावलेला पाऊस शुक्रवारी (ता. २७) पुन्हा जोरदार झाला. यामुळे नायगाव तालुक्यात सरासरी ६५.३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच मुखेड मंडळात ६६.२५ मिलीमीटर, मालेगाव (ता. देगलूर) - ६६.५०, बाऱ्हाळी (ता. मुखेड) ६५.२५, नायगाव तालुक्यातील कुंटूर - ६५.२५, नरसी - ६५.२५, मांजरम - ९०.५० अशा सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५.१० मिलीमीटर पाऊस झाला. 

पावसाने ओलांडली सरासरी
शनिवारी जिल्ह्यात पावसाने चार महिन्याची सरासरी ओलांडली. जिल्ह्यात ता. एक जून ते ता. ३१ सप्टेंबर या चार महिन्यात सर्वसाधारण ७८९.२० मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षीत असते. या तुलनेत शनिवारपर्यंत (ता. २६) ८०३.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पावसाने चार महिन्याची  सरासरी ओलांढत १०१.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस
शनिवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात एकूण पाऊस) नांदेड - ४.३ (७९४), बिलोली - ६.९ (८३१.५०), मुखेड - ३३.३० (८८९.१०), कंधार - २१.९० (७४९.९०), लोहा - ५.१० (७५१.४०), हदगाव - १०.५० (८४६.६०), भोकर - शून्य (८५१.७०), देगलूर - ४४.१० (८५५), किनवट - ४.९० (७४८.३०), मुदखेड - ३.६० (७९३), हिमायतनगर - ४.७० (८२३.५०), माहूर - शून्य (७२३.१०), धर्माबाद - १.५० (८२४.७०), उमरी - ६.३० (८०८.३०), अर्धापूर - शून्य (८१६.८०), नायगाव - ६५.३० (७५५.८०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com