नांदेड : शिक्षण हा सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू- कोषागार सहसंचालक उत्तम सोनकांबळे

प्रल्हाद कांबळे
Friday, 1 January 2021

भीमा कोरेगाव विजय दिन व आंबेडकरवादी मिशन स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती.

नांदेड : सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हेच क्रांतिकारी माध्यम आहे. त्यामुळे विविध सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू शिक्षण हाच असावा असे प्रतिपादन औरंगाबाद येथील कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

भीमा कोरेगाव विजय दिन व आंबेडकरवादी मिशन स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती. यावेळी संघमित्रा सोनकांबळे, संभाजी कदम, सावित्रीबाई कदम, शिवराज टोम्पे, इंजिनीयर नितीन, इंजिनीयर अशोक सांगडे, विद्याताई जावळे, डॉक्टर स्नेहा तारु आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचानांदेड : अर्धापूरच्या शेतकऱ्याने लाॅकडाऊनमध्ये शेती केली अॅनलाॅक, टमाटे, वांग्याचे आणले जोमदार उत्पन्न -

त्यासोबतच महात्मा फुले यांची शिक्षण देण्यासाठी शाळा प्रारंभ करुन हातात लेखणीची ताकद दिली. त्यामुळे शिक्षण हे क्रांतीचा पाया आहे. त्यामुळे या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या प्रसंगी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी व्यक्त केले. आंबेडकरवादी मिशनचा ११ वा वर्धापन दिनानिमित्तचे नियम पाळून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मागील अकरा वर्षात एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अधिकारी करण्यात महत्त्वाचा वाटा या मिशनचा असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Education is the focus of social work - Uttam Sonkamble, Joint Director, Treasury nanded news