Nanded: अकरा कोटी रुपयांचा गांजा नांदेडमधून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा

अकरा कोटी रुपयांचा गांजा नांदेडमधून जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगाव (जि. नांदेड) : गडगा - कहाळा रस्त्यावर मांजरम (ता. नायगाव) येथे ट्रकमधून सुमारे ११ कोटींचा एक हजार १२७ किलो गांजा पकडण्यात आला आहे. गांजा आणि ट्रक जप्त करण्यात आला असून चालकासह अन्य एकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबईतील पथकाने आज पहाटे ही कारवाई केली. दोन दिवसांत मुख्य संशयितांना अटक करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथून जळगावकडे गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबई पथकाला चार दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून सापळा लावला होता. पथक आपल्या मागावर असल्याची कुणकूण गांजा माफियांना लागली होती. पथकाच्या हाती लागू नये, यासाठी त्यांनी ठरलेला, नियमित रस्ता बदलून नांदेडमार्गे जळगावला जाण्याचा प्रयत्न केला. तरीही पथकाने त्यांना गाठले आणि गांजा वाहतूक करणारा ट्र्क मांजरम येथे पकडला. ट्रकमध्ये ४३ पोती गांजा होता.

loading image
go to top