नांदेड : रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘जनावरांचा’ रास्तारोको

पोलिस व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता
 Animal roadblock farmer agitation
Animal roadblock farmer agitationsakal

माहूर : जनावरे चारण्यासाठी जंगलाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण करून रस्ता व्यापगत केल्याने व्यथित झालेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावर माहूर तालुक्यातील पालाईगुडा फाटा येथे सोमवारी सकाळच्या सुमारास गुरेढोरे रस्त्यावर सोडून चक्काजाम आंदोलन केले.

माहूर तालुक्यातील गोंडवडसा सज्जा अंतर्गत येणाऱ्या पांदन (शिवररस्ता) वरील अनाधिकृत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करणे बाबत अर्जदार अविष्कार जयसिंग राठोड व समस्त गावकरी रामू नाईक तांडा येथील जनावरे चारण्यासाठी जंगलाकडे जाणाऱ्या व शेती साहित्य यंत्रसामुग्री इत्यादी ने-आण करण्यासाठी अतिक्रमण झाल्यामुळे अडचणींचा ठरत असलेल्या मुख्य पांदन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु मागील वर्षभरापासून हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून मिळाला नाही. जनावरांना चांगला तर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याअभावी मोठी अडचण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पालाईगुडा फाट्यावर पाळीव जनावरे सोडून चक्का जाम आंदोलन केले.

चक्काजाम आंदोलनाच्या निवेदनाची प्रत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष विनोद राठोड व पोलिस विभागाला आधीच प्राप्त झाल्याने आंदोलनस्थळी सिंदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस आणि लोकप्रतिनिधी यांच्या शिष्टाईमुळे कोणत्याही अनुचित प्रकारा शिवाय रस्ता रोको आंदोलनाची सांगता झाली.

रामू नाईक तांडा येथे रस्त्यावभवी शेतकऱ्यांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून हा रस्ता अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी येथील शेतकरी मागील एक वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे. परंतु प्रशासनाकडून त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेताना दिसून येत नाही. रास्तारोको आंदोलनाची दखल घेऊन महसूल विभागाने शक्य तितक्या लवकर पांदन रस्ता अतिक्रमणमुक्त करावे.

- समाधान जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com