नांदेड : सुभाष साखर कारखानाविरुद्ध जन आंदोलन उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Madhavrao Nivruttirao Patil Jawalgaonkar

नांदेड : सुभाष साखर कारखानाविरुद्ध जन आंदोलन उभारणार

हदगाव - सुभाष साखर कारखान्याच्या मनमानी कारभारास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस वाहतूक ठेकेदार कामगार अक्षरशः वैतागून गेले आहेत. सुभाष साखर कारखाना प्रशासनाने अद्यापपर्यंतही शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम दिली नसून ती रक्कम पंधरा दिवसाच्या आत एक रक्कमी द्यावी अन्यथा सुभाष शुगर साखर कारखान्याविरुध्द जन आंदोलन उभारू असा इशारा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शुक्रवारी रोजी पत्रकार परिषदेत दिला आहे.

विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सुभाष साखर कारखान्याच्या विरोधात त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कारखाना प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की, सदर कारखान्यांनी मतदार संघातील बेरोजगार मुलांना नोकऱ्या द्याव्यात, तालुक्यातीलच वाहतूक ठेकेदारांचा करार करून घ्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना अपमानाची वागणूक न देता सन्मानाची वागणूक द्यावी, त्याचबरोबर कारखाना प्रशासनाचा एकाधिकारशाहीपणा खपऊन घेणार नाही असेही यावेळी बोलताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले. २०२१-२२ या गळीत हंगामात ऊसाची नोंद होऊन सुद्धा चार-पाच महिने प्रशासनाने ऊस नेण्यास विलंब केला.

याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनाची असताना सुद्धा या प्रशासनाने जाळून आणलेल्या ऊसाचे वजन केले. त्याचबरोबर २० टक्के कपात केली ही बाब गंभीर असून सर्व कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अन्यथा आम्हाला कारखाना प्रशासनाच्या विरोधात बंड पुकारावा लागेल असेही जवळगावकर यांनी सांगितले. तसेच साखर आयुक्तांचे आदेश असतानाही हार्वेस्टर ऊस तोडणी करण्यात या प्रशासनाने दोन टक्के ऐवजी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा उचलून दहा टक्के कपात केली.

हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस तोडणीचा कार्यक्रम हा पारदर्शक होणे गरजेचे असून असे होताना दिसत नाही कारण कारखान्याचे कर्मचारी आर्थिक लाभापोटी ऊस तोडणीचा कार्यक्रम मागेपुढे करत आहेत. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ, आत्माराम पाटील वाटेगावकर, नागोराव सूर्यवंशी, कपिल जाधव, शंकर जाधव वाटेगावकर, दिलीपराव चव्हाण आदी उपस्थित होते.

वजन काट्याच्या बाबतीत संशय : जवळगावकर

मागील दोन वर्षापूर्वी भाऊराव प्रशासनाकडून सुभाष शुगर या प्रशासनाने कारखाना खरेदी केला. या दोन वर्षात मतदारसंघात कारखाना उभा राहिला या हेतूने आम्ही मदत केली असून ज्या - ज्या वेळी सहकार्य लागेल त्या - त्या वेळी सहकार्यच केले, परंतु काबाड कष्ट करून माझ्या मतदारसंघातील शेतकरी कारखान्यावर ऊस नेत असताना त्या उसाचे वजन वेळोवेळी कमी येत असल्याचे माझे शेतकरी बांधव मला सांगत आहेत. त्यामुळे मला या कारखान्याच्या वजन काट्याचा संशय येत असून हा वजन काटा तपासल्याशिवाय आगामी हंगामात एकही शेतकरी ऊस देणार नाही असे जवळगावकर यांनी सांगितले.

Web Title: Nanded Farmer Agitation Against Subhash Sugar Factory Mla Jawalgaonkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..