नांदेड : जिल्ह्यात खरिपासाठी शेती मशागतीस आला वेग

आता मॉन्सूनची वाट : रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ २५ मेपासून
Nanded Farmer Agriculture cultivation kharif season Rohini nakshtra start 25 May
Nanded Farmer Agriculture cultivation kharif season Rohini nakshtra start 25 May sakal

नांदेड : मे महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाचा जोर वाढला असून आता रोहिणी नक्षत्राचा आरंभ २५ मे पासून होत आहे. त्यामुळे नवतपाची उष्णता अंगाची लाही लाही करणार, त्यापूर्वीच खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामे शेतकरी उरकून घेत आहेत. शेती कामाला वेग आला असून शेतशिवारात ट्रॅक्टरचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.

शेतकरी खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन चांगले होण्यासाठी शेतात नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात करतात. आता खरीप हंगामातील शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, शेतशिवारात ट्रॅक्टरचे आवाज येऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक युगात बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी, पेरणी करत असल्याचे चित्र दिसून येते. शेतात काडी कचरा जाळणे,शेणखत टाकणे, अशा पद्धतीची कामेही सुरु आहेत. आता लवकरच २५ मे पासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नवतपाचे नऊ दिवस तापणार की पावसाने ओले करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी आठ जूनपासून मृग नक्षत्र प्रारंभ होणार आहे. हवामान खात्या अंदाजानुसार मान्सून या वर्षी विदर्भात लवकर सक्रिय होणार आहे. शिवाय भरपूर पाऊस पडणार असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याचा अंदाच खोटा ठरतो की खरा, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कारण पाऊस येण्यापूर्वी नांगरणी, वखरणी करून शेतजमीन तयार ठेवावी लागते.

शेतात नांगरणी, वखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवण्यात येत आहे. तर यावर्षी पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामाला लागला आहे.उन्हाचा कडाका सुरु झाला की शेतकरी नांगरणी, वखरणी करतात. उन्हाळ्यात नांगरणी पखरणी केल्याने पिकावर रोगराईच्या प्रभाव कमी प्रमाणात होतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. तर काही शेतकऱ्यांनी गव्हाचे गाड तसेच धुऱ्यावरील वाढलेले गवत जाळणे सुरु केले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेतशिवार पुन्हा गजबजू लागले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून पेरणीपूर्व मशागतीला आता जिल्ह्यात वेग आल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com