esakal | Nanded: अतिवृष्टीग्रस्तांसाठी लागणार ४१९ कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Crop insurance

नांदेड : अतिवृष्टीग्रस्तांसाठी लागणार ४१९ कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवून सहा लाख सहा हजार ३२८ हेक्टरमधील जिरायती, बागायतीसह फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधीक नुकसान झाले. यात आठ लाख ६१ हजार ७५६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ४१९ कोटी ४२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यात जुले महिन्यातील नुकसानग्रस्तांच्या ३० कोटी ३५ लाखांच्या निधीचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात जुलै तसेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होवून पूरस्थिती उद्भवली होती. यामुळे जिरायती पिकांसह बागायती तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात पिके बुडाली होती. नुकसानीचे प्रमाण अधीक असल्याने प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार कृषी, महसुल व जिल्हा परिषद यंत्रणेकडून पंचनामे करण्यात आले होते. जिल्ह्यात जुलैमध्ये ७१ हजार २२१ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी ३० कोटी ३५ लाख ४६ हजार रुपयाची मदत मंजूरी मिळाली आहे. तर ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये सात लाख ९० हजार ५३५ शेतकर्‍यांचे एकूण पाच लाख ६१ हजार ७१९ हेक्टरचे नुकसान झाले.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यासाठी ३८९ कोटी सहा लाख रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेर एकूण आठ लाख ६१ हजार ७५६ शेतकर्‍यांचे सहा लाख सहा हजार ३२८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यासाठी एकून निधी ४१९ कोटी ४२ लाख रुपये लागणार आहेत.

एनडीआरएफच्या निकषानुसार मागणी

जिल्हा प्रशासनाने प्रचलित नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार केली आहे. यात जिरायतीसाठी हेक्टरी सहा हजार आठशे, बागायतीसाठी हेक्टरी १३ हजार पाचशे तर फळबागेसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांचा समावेश आहे. दरम्यान शासन कोणत्या निकषानुसार मदत देईल, हे निधी दिल्यानंतर कळेल. यापूर्वी राज्यपालांनी जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार तर मागील वर्षी शासनाने हेक्टरी दहा रुपये मदत दिली होती.

जुलै व ऑगस्ट-सप्टेंबरमधील एकूण नुकसान, लागणारा निधी

तालुका शेतकरी नुकसान क्षेत्र अपेक्षीत निधी

नांदेड ४२०९४ २३१६० १५ कोटी ९१ लाख

अर्धापूर ३२४१२ २२६३६ १५ कोटी ४५ लाख

कंधार ७४८०१ ५०७८२ ३४ कोटी ५४ लाख

लोहा ११७९६२ ५८२६२ ४० कोटी ०८ लाख

बिलोली ५९१३० ४२०२५ २८ कोटी ६४ लाख

नायगाव ५४८४३ ४२८९१ २९ कोटी ५० लाख

देगलूर ६२१३७ ४५७९४ ३१ कोटी २९ लाख

मुखेड ८०२७७ ५८४६४ ३९ कोटी ८३ लाख

भोकर ४२३१७ ३८४८५ २६ कोटी १८ लाख

मुदखेड ३००३२ २२३५५ १५ कोटी ९५ लाख

धर्माबाद ३७७८० २५३९७ १७ कोटी २९ लाख

उमरी ३३८७३ ३३९१९ २७ कोटी ४६ लाख

हदगाव ८२५३२ ५०००२ ३४ कोटी

हिमायतनगर ३२५२१ २१९७२ १४ कोटी ९५ लाख

किनवट ५३९७० ५६५५३ ३९ कोटी

माहूर २५०७४ १३६३० नऊ कोटी २७ लाख

एकूण ८६१७५६ ६०६३२८ ४१९ कोटी ४२ लाख

loading image
go to top