esakal | नांदेड : हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर, हिमायतनगर परिसरात भितीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ही घटना रविवारी (ता. २७( सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र दुसरी महिला या हल्ल्यातून बचावली. जखमी महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

नांदेड : हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर, हिमायतनगर परिसरात भितीचे वातावरण

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील आंदेगाव येथील दोन महिला शेतातील काम करुन घराकडे परतत असताना एका हिस्त्र जंगली प्राण्याने एका महिलेवर हल्ला केला. यात सदरची महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. २७( सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र दुसरी महिला या हल्ल्यातून बचावली. जखमी महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
 
तालुक्यातील आंदेगाव येथील वच्छलाबाई पुंडलीक चिकनेपवाड (वय ५०) व राजाबाई मारोती चिकनेपवाड (वय ५५) ह्या दोघी जावा शेतात रविवारी दिवसभर काम करुन सायंकाळी घराकडे परतत होत्या. यावेळी रस्त्यात दबा धरुन बसलेल्या एका हिंस्त्र जंगली प्राण्याने दोघीपैकी वच्छलाबाईवर जोरदार झडप टाकून हल्ला केला. यात त्या जबर जखमी झाल्या. सदर महिलेला ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले आहे.

सदर वन्यजीव हा हिंस्त्र जातीचा लांडगा किंवा अस्वल असल्याचे बोलले जात आहे. गावापासून दोन किलोमिटरवर मोठे जंगल असून गावाजवळ दरेसरसम तलाव असल्याने जंगली प्राणी पाणी पिण्यास तलावावर येत असतात. मागच्याच आठवड्यात आंदेगाव शेजारीच पवना गावातील एका शेतकऱ्याच्या आखाड्यावरील वासरावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची ताजी घटना असताना पुन्हा शेतकरी महिलेवर जंगली प्राण्याने हल्ला केल्याने ह्या परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनपाल श्री. गोरलावाड यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपुस केली. या परिसरात वावरणाऱ्या वन्यप्राणाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top