नांदेड : हरभरा विक्रीसाठी मंगळवारपर्यंत नोंदणी करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded farmers Register for sale gram till Tuesday

नांदेड : हरभरा विक्रीसाठी मंगळवारपर्यंत नोंदणी करावी

नांदेड : जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या हरभऱ्याच्या विक्रीपूर्व नोंदणीसाठी शासनाने मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. अशावेळी नोंदणीविना शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, व्हीसीएमएफ व महाएफपीसीकडून करण्यात आले आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेनुसार नाफेडकडून जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को - आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को - आपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन, महा फार्मस प्रोड्यूसर कंपनी व पृथ्वाशक्ती एफपीसी या एजन्सीच्या माध्यमातून ५४ ठिकाणी हरभऱ्याची शासकीय खरेदी होत आहे. ता. एक मार्चपासून सुरु झालेल्या हरभरा खरेदीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्राना हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. आजपर्यंत चार लाख क्विंटलपर्यंत हरभरा खरेदी झाला आहे.

सध्या विक्रीपूर्व नोंदणी सुरु असली तरी त्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट को - आपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील, विदर्भ को-आपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन वैभव ठाकरे, महा फार्मस प्रोड्यूसर कंपनीचे जिल्हा समन्वयक गणेश बिरु यांनी केले आहे.

Web Title: Nanded Farmers Register For Sale Gram Till Tuesday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top