नांदेड : शहरातील पाच विकासकामांचे भूमीपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; महापौर, आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
Nanded five development works Inauguration by Guardian Minister
Nanded five development works Inauguration by Guardian Ministersakal

नांदेड : नांदेड महानगरातील वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते व इतर आवश्यक सोई - सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे विविध विकासकामांचे शनिवारी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या भूमिपूजन समारंभास कॉँग्रेसचे गटनेते आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, संतबाबा बलविंदरसिंघजी, डॉ. मीनल पाटील खतगावकर, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफार, सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, रोहित तोंडले, संतोष नाईक, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, सभापती अपर्णा नेरलकर, नगरसेविका प्रकाशकौर खालसा, अमीतसिंह तेहरा, भानुसिंह रावत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, बर्की चौक, महाराणा प्रताप चौक सिडको, छावा चौक कौठा येथे भूमीपूजन करण्यात आले. लातूर फाटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते ढवळे कॉर्नर व महाराणा प्रताप चौक सिडको ते हडको पाण्याची टाकी, उस्माननगररोड लिंक रस्त्याचे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह स्थळाची सुधारणा केली जाणार आहे.

रवीनगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी ते साई कमान ते वसरणी येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह सुधारणा करणे, रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - मुथा चौक - महावीर चौक - गुरुद्वारा चौक (देना बॅक चौक) - जुना मोंढा - बर्की चौक - पहेलवान टी हाऊस - देगलूरनाका येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह सुधारणा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - महात्मा गांधी पुतळा - फॉरेस्ट ऑफीस चौक - गुरुद्वारा गेट नंबर एक ते रणजीतसिंह मार्के (भगतसिंग चौक) - केळी मार्केट चौक - कब्रस्तानच्या घर बाजूने उर्दू घरापर्यंत रस्ते व नाली बांधकाम आदी करणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक - हिंगोली गेट पूल - यात्री निवास पोलीस चौकी - फॉरेस्ट ऑफीस ते महावीर चौक - मल्टीपर्पज हायस्कूल ते बंदाघाट लिंक सिमेंट रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com