नांदेड : उरलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Heavy Rain Crop Damage latest marathi news

नांदेड : उरलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड सुरू

नांदेड : गेल्या दोन दिवसापासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतातील मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मागील आठवडाभरात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतातही पाणी साचून पिके पिवळी पडत होती. त्यामुळे पिकांची वाढही खुंटली होती. आता शेतात उरल्या सुरल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर जिल्हाभर दोन तीन दिवस संततधार पाऊसही झाला. त्यामुळे नदी, नाले, ओढे सगळे भरून वाहत होते. काही ठिकाणी शेतात पाणी साचून शेततळ्याचे स्वरुप आले होते. त्यामुळे शेतकरी देखील हतबल झाला होता.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने शेतातील मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. शेतात साचलेले पाणी काढण्यापासून ते तण काढण्याचे काम सुरू आहे. मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळी पडून वाढ खुंटली असल्यामुळे आता शेतात उरल्या सुरल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. पिकांना खत शिंपडताना दिसून येत आहेत.

२४ तासांत सरासरी १९.८० मिलिमीटर पाऊस

नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासात सरासरी १९.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ७२८.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या वर्षी ता. एक जूनपासून पडलेल्या एकूण पावसाची आहे. नांदेड - २२ (६८०.६०), बिलोली - १३.४०(७७५.४०), मुखेड - ९.१० (६६९.७०), कंधार - ७.५० (६८९.८०), लोहा - १४.५० (६५०.२०), हदगाव - १६ (६५०.८०), भोकर - ३२.७० (८३६.७०), देगलूर - ७.२० (६२७.१०), किनवट - २७.६० (८०१), मुदखेड - ३२.१० (८८४.९०), हिमायतनगर - ८१.५० (१०१०.६०), माहूर - १५.६० (६६२), धर्माबाद - १२.६० (८०६.७०), उमरी - २९.२०(८९६.३०), अर्धापूर - २४.१० (६६९.५०), नायगाव - १७.६० (६६५.८०).

Web Title: Nanded Heavy Rainfall Farmers Crop Damage Struggle To Save Remaining Crops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top