नांदेड- बुधवारी सर्वात जास्त २३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद

शिवचरण वावळे | Wednesday, 19 August 2020

बुधवारी सर्वात जास्त २३० रुग्ण आढळले  जितक्या जास्त स्वॅब टेस्ट तितक्या लवकर कोरोनाची साखळी तोडता येईल असा जिल्हा प्रशासनास विश्‍वास वाटत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.

नांदेड : मंगळवारी (ता.१८) तपासणीसाठी आलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता.१९) एक हजार १५९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात औषधोपचारातून १३९ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

नांदेड जिल्हा कोरोना मुक्त व्हावा, यासाठी जिल्हाभरात कोरोना चाचणी सुरु आहेत. कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांना शोधून त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. यातून रोज नव्या रुग्णांची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सापडलेल्या २३० बाधित रुग्णांपैकी ११६ रुग्ण हे नांदेड महापालिका क्षेत्रातील आहेत तर उर्वरित रुग्ण हे तालुका व इतर जिल्ह्यातील आहेत. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्ण संख्या चार हजार ५५५ इतकी झाली आहे. अनेक रुग्ण कोरोनावर मात करत असल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. बुधवारी १३९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा- 

जिल्ह्यातील मृत्यू संख्या १५९

आत्तापर्यंत दोन हजार ७०० रुग्ण कोरोना मुक्त झाले. विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन महिला व दोन पुरुष यासह खासगी रुग्णालयातील एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५९ वर पोहचली आहे. बुधवारी मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये लोहा येथील पुरुष (वय ६५), विष्णुपुरीतील महिला (वय ५२), आनंदनगरची महिला (वय ४३), तामसा येथील महिला (वय ६०), विष्णुपुरीतील पुरुष (वय ५४), वजिराबादमधील पुरुष (वय ८४) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. 

जिल्हाभरात एक हजार ६६६ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यासह इतर ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार ६६६ इतकी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील १७५ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
 
अशी आहे बुधवारची रुग्णसंख्या 

नांदेड शहर - ११६, नांदेड ग्रामीण - आठ, बिलोली - सहा, हदगाव - १३, कंधार - चार, मुखेड - सात, अर्धापूर - दोन, देगलूर - १८, लोहा - १३, मुदखेड - तीन, धर्माबाद - १६, उमरी - सहा, नायगाव - आठ, भोकर - चार, हिंगोली - दोन, लातूर - एक, परभणी - दोन, एकुण २३० रुग्ण 

हेही वाचा- 

उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - १८८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर - ७६६, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय - २१, जिल्हा रुग्णालय - ४०, नायगाव - ३६, बिलोली - ३७, मुखेड - १०४, देगलूर - ६९, लोहा - ५२, हदगाव - १२, भोकर - २१, कंधार - १३, धर्माबाद - ९९, किनवट - १४, अर्धापूर - तीन, मुदखेड - ३१, माहूर - चार, बारड - एक, उमरी - २५, खासगी रुग्णालय -१२९, औरंगाबाद संदर्भित - चार, निजामाबाद संदर्भित - एक, हैदराबाद संदर्भित - एक, 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण घेतलेले स्वॅब - ३१ हजार ६४२ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब - २५ हजार ३२० 
एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - चार हजार ५५५ 
बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - २३० 
बुधवारी मृत्यू - सहा 
एकुण मृत्यू - १५९ 
बुधवारी रुग्णालयातून सुटी - १३९ 
आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण - दोन हजार ७०० 
बुधवारी प्रलंबित स्वॅब - १७१ 
बुधवारी गंभीर प्रकृतीचे रुग्ण - १७५