नांदेड : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
Monday, 9 November 2020

हा प्रकार शहराच्या भावसारचौक परिसरातील पवननगर भागात ता. सात आॅक्टोबर रोजी घडला होता. या प्रकरणी शनिवारी (ता. सात) नोव्हेंबर भाग्यनगर पोलिस ठाण्यात पत्नी व तिच्या एका नातेवाईकाविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : समाजात अनेक घटनात हुंडा, चैनिच्या वस्तु, प्लाट, घर, गाडी खरेदी करण्यासाठी माहेराहून पैशाची मागणी करुन सासरची मंडळी विवाहितांना त्रास देतात. म्हणून या त्रासाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करतात. आता तर चक्क नांदेडच्या एकाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शहराच्या भावसारचौक परिसरातील पवननगर भागात ता. सात आॅक्टोबर रोजी घडला होता. या प्रकरणी शनिवारी (ता. सात) नोव्हेंबर भाग्यनगर पोलिस ठाण्यात पत्नी व तिच्या एका नातेवाईकाविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका युवतीशी नांदेडच्या पवननगर भागातील प्रशांत बचंटी (वय ३७) याच्यासोबत रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. लग्नानंतर प्रशांतची पत्नी त्याच्यासोबत काही दिवस चांगली राहिली. त्यानंतर ती त्याच्यासह सासु- सासऱ्याचा छळ करत होती. यासाठी तिचा एक नातेवाईक मदत करत असे. विविध कारणावरुन पत्नीकडून सप्टेंबर २०१८ ते ता. सहा आॅक्टोबर २०२० पर्यंत नेहमी मारण्याच्या धमक्या तसेच मानसिक छळ सुरु असल्याने या त्रासाला कंटाळून अखेर प्रशांतने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

हेही वाचा हिंगोलीत महिला व विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाठी मार्शलसह दामीनी पथक सक्रिय

पत्नीसह तिच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात मयताच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरुन पत्नीसह तिच्या एका नातेवाईकावर आत्महत्येस परावृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपूर्वी प्रशांत बचंती यांच्याशी पत्नी नेहमी वाद घालत असे. त्यांचे सुरुवातीपासून संसारात खटके उडत होते. त्यात प्लॉट आणि घर घेण्यासाठी प्रशांतच्या मागे तगादा लावला होता. एवढेच नाही तर सासरा व सासूना शिवीगाळ करुन त्रास देत होती. त्याचबरोबर पोलिसात गुन्हा नोंदवून न्यायालयात बघून घेण्याची धमकी देत होती. सततच्या त्रासाला कंटाळून प्रशांत यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Husband commits suicide after being harassed by his wife nanded news