नांदेड : लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थांचे वाढले भाव

वधू-वर पालकांची गरज ओळखून मध्यस्थांचे वाढले प्रमाण
Nanded Increased prices of marriage manegement company
Nanded Increased prices of marriage manegement companysakal

नांदेड : काही वर्षांपूर्वी लग्न जुळवून देणाऱ्यांचे प्रमाण मोजकेच होते. त्यावेळी दोन्हीकडे चांगले स्थळ मिळाले की त्यांचे समाधान होत असे. मात्र, सध्या जिकडे तिकडे मध्यस्थांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याशिवाय कामच होत नाही अशी परिस्थिती आहे. आधीच लग्नासाठी नवरदेवाचा घोडा अडलेला, त्यात मध्यस्थांचा भाव अधिकच वाढला अशी स्थिती सध्या झाली आहे.

विवाह जुळवून देणाऱ्या अनेक नोंदणीकृत संस्था शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत. या संस्थांमधून नियमानुसार शुल्क आकारून विवाह जुळवून देण्याची कामे केली जातात. मात्र या संस्था व्यतिरिक्त ग्रामीण भागासह वर पक्षाकडील लोकांकडून रक्कम उकळण्यात काही जण तरबेज झाले आहेत.

मुलाचे वय जास्त झाले असेल तर, विवाह रखडला असेल तर, पालक कसलाही विचार न करता संबंधितांना ते मागतील तेवढी रक्कम देऊन लग्न जुळवण्याच्या खटपटी करू लागले आहेत. बायोडाटा सोबत पैसे मिळाले तरच हे मध्यस्थी बायोडाटा पुढे सरकवतात. इच्छुक वराचा पिता फक्त स्थळाची माहिती मिळवायला मध्यस्थाच्या खिशात काही हजार रुपये सरकवतात. वरपित्यासह नवऱ्या मुलाला वधुचा बायोडाटाही पाहायला मिळत नाही. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षदा पडताच मध्यस्थांच्या हातात ठरलेली रक्क द्यावी लागते.

मध्यस्थितींनी वाढवले भाव

काही वर्षांपूर्वी नातेवाईकांमध्येच संबंध करण्यास प्राधान्य दिले जायचे. सध्या नातेवाइकांचा गोतावळा मागे पडत चालला आहे. अनेक जण नवीन पाहुण्याच्या घरी मुलगी देण्यास उत्सुक असून, अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. ही संधी साधून मध्यस्थींनी आपले भाव वाढवल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम

पूर्वी एकत्रकुटुंब पद्धत होती. त्यामुळे मुला-मुलींचे लग्न जुळवणे सहज शक्य होते. परंतु, अलिकडे नोकरीसाठी मुळ गावापासून दूरवर गेल्यामुळे मुला-मुलींचे लग्न जुळवण्यासाठी पालकांना तारेवरचे कसरत करावी लागत आहे. मनासारखा जोडीदार मुला-मुलींना मिळावा यासाठी पालकांना मध्यस्थाची मदत घ्यावी लागत आहे. ही गरज ओळखून समाजामध्ये लग्न जुळवून देणाऱ्या मध्यस्थांची वाढ होत असून, त्यांचे पोट भरण्याचे साधनच झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com