भाजीपाल्यांचे दर कडाडले

लग्नसराईत उत्पन्नात झाली घट ः ग्राहकांचा खरेदीला आखडता हात
Nanded inflation vegetables Price rate hike
Nanded inflation vegetables Price rate hikesakal

नांदेड : शहरासह तालुक्यातील आठवडी बाजारात ऐन लग्नसराईमध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्याने तसेच उन्हाळ्यात शेतीला मुबलक पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भाजीचे दर चांगलेच वाढले आहेत.

शहरामध्ये येणाऱ्या होलसेल भाजीवाल्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट भाववाढीवर झाला आहे. शहरातील भाजी मंडई तसेच तालुक्यातील आठवडी बाजारात भाज्या ५० ते ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. यावर्षी उन्हाळ्यात तापमान ४३ अंशाच्या पुढे गेल्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यातच लग्नसराईची धूम सुरु असल्याने आयोजकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

मागील महिन्यापासूनच भाजीपाल्यांचे भाव वाढत चालले आहेत. उन्हाळ्यात भाजीपाल्यांची आवक कमीच असते मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता जास्तच वाढल्याने शेतातील जलस्त्रोत आटत चालले आहेत. परिणामी पाणी उपलब्ध होत नसल्याने उत्पन्नात घट झाली आहे. शहरातील मंडईसह तालुक्यातील आठवडी बाजारात होलसेल भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. हिरवी मिरची ६० रुपये किलोने विकली जात आहे. गवार, वाल, दोडके, फ्लाॅवर, शेवगा या भाज्यांचे भाव गेल्या काही दिवसांत दुप्पट वाढले आहेत.

ज्या पालेभाज्या ३० रुपये किलो होत्या, त्या आता ४० ते ६० रुपये किलोने विकल्या जात आहेत. हिरवी मिरचीचे भाव मागील महिन्याभरापासून स्थिर असून हिरवी मिरची ५० ते ६० रुपये किलोने ग्राहक खरेदी करत आहेत.

मजुरांची होतेय ओढाताण

उन्हाळ्यात भाजीपाल्यांच्या आवकवर परिणाम होऊन भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना गॅस, किराणा मालाच्या पाठोपाठ आता भाजीपाला दरातही भाववाढ झाल्याने तारेवरची कसरत करून जीवनोपयोगी वस्तू खरेदी कराव्या लागत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

असे आहेत दर (किलोमध्ये)

भेंडी ः ५० रुपये, दोडके ः ४० फ्लाॅवर ः ४०, कारले ः ६० काकडी ः ३० गवार ः ४० वाल ः ५० बटाटे ः २५ टोमॅटो ः ५० ते ६० कांदा ः १० हिरवी मिरची ः ६० शेवगा ः ५० शेपू जुडी ः १० मेथी जुडी ः १५ ते २० कोथिंबीर जुडी ः १० ते १५ लिंबू ः ५० रुपये डझन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com