नांदेड : वाचन चळवळीचे संवर्धनकर्ते कडगेकाका यांचे निधन

बी. एस. कडगे यांनी अनेक वर्षे जीवन विमा प्रतिनिधी म्हणून कार्य केले. आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी शेकडो लोकांशी जवळीक साधली.
नांदेडचे कडगेकाका यांचे निधन
नांदेडचे कडगेकाका यांचे निधन

नांदेड : नांदेड शहरात घरोघरी जाऊन लहान- थोरांना निवडक व उत्तम प्रकारची पुस्तके पुरवून वाचन चळवळीचे संवर्धन करणारे बी. एस. कडगे काका यांचे शुक्रवार (ता. १८) रोजी सकाळी दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ७५ वर्षांचे होते.

बी. एस. कडगे यांनी अनेक वर्षे जीवन विमा प्रतिनिधी म्हणून कार्य केले. आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी शेकडो लोकांशी जवळीक साधली. त्यांना आपलेसे केले. कडगे यांना वाचनाची आवड होती. या आवडीतूनच ते ज्याही संमेलनाला जात तेथून संस्कारक्षम पुस्तकांची स्वखर्चाने पुस्तके खरेदी करीत. ही पुस्तके घरोघरी नेऊन देत. विद्यार्थ्यांनी वाचावीत म्हणून शाळांनासुद्धा पुस्तकांचे संच पुरवीत.

हेही वाचा - नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक मान्यताप्राप्त नेते आहेत, असं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे.

संस्कारशील समाजाची निर्मिती व्हावी हा यामागे त्यांचा सद्हेतू होता. अनेक कार्यक्रमांमधूनही त्यांनी उत्तम पुस्तके सर्वांनी वाचली पाहिजेत याचा संदेश देत. दररोज ते ज्यांचा त्या दिवशी वाढदिवस असेल त्यांना कडगेकाका आवर्जून शुभेच्छा संदेश देत. हा उपक्रम त्यांचा पंचवीस- तीस वर्षांपासून चालू होता. त्यांचे अनेक चाहते त्यांना 'कडगेकाका' या नावानेच ओळखत.

त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कडगेकाकांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे रवी व राहुल आणि एक मुलगी रेखा आणि सुना व नातू, नाती असा मोठा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com