नांदेड : कापशी - हिंदोळा पुलाचे काम अर्धवटच

दोन वर्षांपासून संथगती; वाहन चालविणे झाले धोक्याचे
Nanded Kapashi Hindola bridge construction Work incomplete
Nanded Kapashi Hindola bridge construction Work incomplete

मारतळा : दोन तालुक्यांना जोडणारा मारतळा मार्गे कौठा, मुखेड - कंधार - लोहा असा जाण्यासाठी जवळचा मार्ग असून कापसी - हिंदोळा (ता. लोहा) या मार्गावरील पुलाचे मागील दोन वर्षांपासून अर्धवटच राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात चालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील दोन वर्षापासून या पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे व पुलाची उंची कमी झाल्यामुळे मागील वर्षी पुरात दोनदा पुलावरून पुराचे पाणी वाहून रस्ता बंद झाल्याने सदर गावांचा संपर्क तुटला होता.

भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा वाहनधारकांना तासन तास पुर ओसरेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसेच अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे. मारतळा मार्गे कौठा मुखेड, गोळेगाव - उस्माननगर, कंधार व लोहा जाण्यासाठी जवळचा मार्ग असून व नांदेड, बिदर मार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रीटने जोडून लेव्हल करणे गरजेचे आहे.

यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुलाचे अर्धवट काम गेले दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. ते तत्काळ पूर्ण करावे, तसेच अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने निकृष्ट कामे होऊनही जिल्हा प्रशासन मात्र गप्प का? असा सवाल या भागातील नागरिकांतून होत आहे. या बाबत उलट सुलट प्रतिक्रियाही ऐकायला येत आहेत. शेतच कुंपन खात असल्याने तक्रार तरी कोणाकडे करणार? तक्रार केल्यास तेच अधिकारी चौकशीला येणार व थातूर मातुर चौकशी होणार? असे या भागातील नागरिक सांगत आहेत.

पुराने निकृष्ट कामाचे पितळ उघडे

मागील वर्षीच्या अतिवृष्टीने या पुलावरून दोनदा पुराचे पाणी गेले होते. तेव्हा येथील पुलावर खड्डे पडले होते. मात्र, आपल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडू नये म्हणून रातोरात भराव टाकला होता. मात्र, तेव्हा परिसरातील नागरिकांनी पक्के काम करण्याची मागणी केली होती. पण पावसाळा आला तरी खड्डे जैसे थे च आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com