esakal | नांदेड : किसान रेल योजनेचा लाभ नांदेडसह मराठवाड्याला मिळेना, खासदारांनी लक्ष देण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यात पैसा, वेळ याची बचत होवून शेतक-यांना फायदा होईल. विशेषतः नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील केळी उत्पादक व शेतक-यांना होणार आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात नागपूर ते दिल्ली व देवळाली ते दानापूर (बिहार) अशी सुरु आहे.

नांदेड : किसान रेल योजनेचा लाभ नांदेडसह मराठवाड्याला मिळेना, खासदारांनी लक्ष देण्याची गरज

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : शेतक-यांना फळे, भाजीपाला, फुल वाहतूक देशातील मोठ्या शहरातील बाजारपेठेत कमी वेळात व कमी खर्चात करण्यात यावी यासाठी किसान रेल ही योजना सुरु झाली आहे. विकासाच्या कामात नेहमी उपेक्षित व मागे राहिलेला मराठवाडा या योजनेपासून वंचित राहिला आहे.ही रेल्वे सुरु झाल्यास भाजीपाला, फळे व फुल वाहतुकीला फायदा होणार आहे. यात पैसा, वेळ याची बचत होवून शेतक-यांना फायदा होईल. विशेषतः नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील केळी उत्पादक व शेतक-यांना होणार आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात नागपूर ते दिल्ली व देवळाली ते दानापूर (बिहार) अशी सुरु आहे.


शेत मालाची वाहतूक, विक्री हा शेतीच्या उत्पन्नातील महत्वाचा घटक आहे. ब-याचवेळेला वाहतूकीमुळे नाशिवंत पिकांचे खुप मोठे नुकसान होते. हे सर्व टाळण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे ही योजना चार महिन्यांपूर्वी सुरु केली आहे. या योजनेचा फायदा शेतक-यांना होत असून काही दिवसापुर्वी शंभरव्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. ही योजना पीपीपी योजनेतून राबविण्यात येत माल वाहतुकीसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात येते.

हेही वाचाडॉ. शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार डॉ. प्रभू गोरे यांना तर कै.सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार धनंजय लांबे यांना जाहीर -

मराठवाड्यातील शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतक-यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. नांदेड, हिंगोली व परभणी या तिन जिल्हात केळीची लागवड खूप मोठ्या क्षेत्रावर केली जाते. तसेच धर्माबाद येथे मिर्ची, मुदखेडला फुले तसेच या तिन्ही जिल्हा टरबूज, पपई, टमाटे, वांगे यासह ईतर भाजीपाला, फळं उत्पादित केली जातात. हा उत्पादित केलेला शेत माल राज्यासह देशातील मोठ्या शहरात पाठविण्यात येतो.

या भागात विशेषतः केळीची लागवड खूप मोठी आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव, हिंगोलीमधील कळमनुरी, वसमत, परभणी पाथरी आदी भागातील केळी उत्तर व दक्षिण भारतातील मोठ्या शहरात जाते. तसेच विदेशातही जाते. ही सर्व वाहतूक ट्रकने करण्यात येते. उत्तर भारतातील शहरात केळी पाठविण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात तर प्रती टन सुमारे चारशे ते हजार खर्च येतो. शिवाय अपघात, माल खराब होणे आदी धोके असतात. नांदेडपासून हे अंतर सुमारे दिड ते दोन हजार किलो मिटरचे आहे. 

येथे क्लिक करास्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी असलेल्या बंदिस्त जोखडातून मुक्त करण्याचे काम अत्यंत जिद्दीने सावित्रीबाईंनी केले.

या भागातील केळी काढणीचा हंगाम जुन ते आक्टोंबर या काळात असतो. याकाळात साधारणपणे दररोज पाचशे ट्रकमधून पाच ते सात हजार टन केळी राज्यासह देशभर पाठविण्यात येते. एका ट्रकला अंतराप्रमाणे 30 हजार ते 60 हजार लागते तसेच वाहतूकीसाठी तीन ते चार दिवस लागतात. या शेत माल खराब होण्याची शक्यता असते.

महाराष्ट्रात नागपूर ते दिल्ली, देवळाली ते दानापूर ( बिहार ) अशी किसान रेल्वे सुरु आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने नांदेड- दिल्ली, नांदेड काश्मीर तसेच नांदेड कन्याकुमारी अशी किसान रेल्वे सुरु करण्याची मागणी शेतकरी करित आहेत. अशी रेल्वे सुरु झाल्यास दिड दिवसात वाहतूक खर्चात दहा ते विस हजाराची बचत प्रति ट्रक होणार आहे. याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. नांदेड येथे माळटेकडी हे वाहुकीसाठी रेल्वे स्टेशन उपलब्ध आहे. या महत्त्वाच्या मागणीकडे खासदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे