नांदेड : पड रं पाण्या.. पड रं पाण्या.. म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ

मारतळ्यासह परिसरात अद्याप एकही दमदार पाऊस नाही
Nanded Martala no heavy rain
Nanded Martala no heavy rainsakal

मारतळा : मारतळ्यासह परिसरात अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. तरी पण हलक्याच पावसावर कापूस व हळद शंभरगाव, वाळकी, गोळेगाव, कापसी, जोमेगाव, उमरा व उमरा तांडे लागवड व तुरळक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

पण जमिनीतील ओलावा ओसरल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर मारतळा येथे अजून पेरणीला सुरुवातच झालेली नाही. जून महिना अर्धा संपला तरी अद्याप दमदार पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिणामी सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पड रं पाण्या ...पड रं पाण्या...कर पाणी पाणी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कापसी मंडळात झालेल्या पावसाची नोंद

कापसी महसूल मंडळात झालेल्या पावसाची नोंद (तारीख व मिलिमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. (ता.नऊ) ९ मिलीमीटर, (ता.१२) ३८, (ता.१३) ३, व (ता.१७) ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे अद्यापही परिसरात दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

यंदा वेळेवर पाऊस होईल ,अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र मृगनक्षत्र लागून आठवडा उलटला. पण अद्यापही परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. परिणामी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

- बाबुराव मालीपाटील ढगे, शेतकरी मारतळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com