नांदेड : आमदार सतीश चव्हाण यांचा पदवीधर मतदारांशी संवाद 

file photo
file photo

नांदेड - कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी शंकर कनिष्ठ महाविद्यालयास भेट देऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांशी मागील काळात सोडवलेले विविध प्रश्न तसेच उर्वरित प्रश्नदेखील सोडविण्याचे आश्वासन दिले.

सभेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण व श्रीकांत काळे हे होते. व्यासपीठावर प्रा.नारायण शिंदे, प्रा. जांभरूनकर, प्रा. मझरोद्दीन, शिवाजीराव देशमुख, आर. डी. कांबळे, कल्पना डोंगळीकर, अनुराधा पाटील, श्राीमती रावणगावकर यांची उपस्थिती होती. तसेच श्री पांपटवार, प्रा. निलेश राठोड, प्रा. राम जाधव, प्रा. श्रीधर जाधव, साहित्यिक डॉ. शंकर विभुते, आविष्कार साहित्य मंडळाचे सल्लागार शिवाजी देशमुख, ह.भ.प. भास्कर शिंदे महाराज, ऍड. बचाटे, श्री.वानखेडे, डी.एम. जाधव, श्री मुंडे, श्री वडजे, श्री गजले, आनंद मोरे, श्री मोरे सर राहाटी, भास्कर कळकेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य आणि संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मेथे यांनी केले, सूत्रसंचालन उद्धव ढगे यांनी केले, तर आभार जयवंत शिंदे यांनी मानले. संयोजक म्हणून संस्थेचे सचिव तिरुपती मेथे, प्राचार्य कोपरे, प्रा. धात्रक, प्रा. वाघमारे, संतोष बस्वदे आणि  विलास पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com