दुचाकीवरुन जाताना तोल जाऊन पडल्याने आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी | Nanded Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
दुचाकीवरुन जाताना तोल जाऊन पडल्याने आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

दुचाकीवरुन जाताना तोल जाऊन पडल्याने आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : अर्धापूर-वारंगा रस्त्यावरील पार्डीजवळ कळमनुरीकडून (Kalamnuri) अर्धापूरकडे दुचाकीवरून मुलगा व आई येत असताना आईचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.२४) सकाळी झाली आहे. या अपघाताची महामार्ग सुरक्षा पथक वसमत यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर-वारंगा रस्त्यावरील पार्डीजवळ कळमनुरीकडून अर्धापूरकडे (Ardhapur) दुचाकीवरून (एमएच २६ एडब्ल्यु ३९२३) कोंडीबा मारोती खोकले (वय २८) व त्यांची आई जनाबाई मारोती खोकले (वय ५३, दोघेही रा. वाळकी बुद्रुक, ता.किनवट) हे येत असताना तोल गेल्याने जनाबाई मारोती खोकले या दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. (Nanded)

हेही वाचा: तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अपघात,तेल सांडल्याने वाहतूक बंद

त्यांना उपचारासाठी अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे कर्मचारी शेळके, पी.एन.श्रीवास्तव, वसंत सिनगारे यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमीला उपचारासाठी अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविले.

loading image
go to top