Nanded : जनतेची कामे करण्यासाठी कामाला लागा; हेमंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded MP Hemant Patil Shiv Sena deputy leader

Nanded : जनतेची कामे करण्यासाठी कामाला लागा; हेमंत पाटील

नांदेड : तीन - चार पक्ष फिरुन आल्यानंतर त्यांना निष्ठावान असल्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी फक्त माझ्यावर मी किती इमानदार असल्याचे ते सतत प्रयत्न करत आहेत. परंतू माझ्यावर टीका करुन त्यांना पदे मिळणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य करुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या.

खासदार हेमंत पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर ते नांदेडला आल्यावर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी (ता. १७) संध्याकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यानंतर खासदार पाटील यांच्या हस्ते आणि आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना निवडीचे प्रमाणपत्राचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते.

खासदार पाटील म्हणाले की, मागील अडीच तीन वर्षापासून केवळ बैठका होत असत. परंतू एकही शासन निर्णय होत नव्हता. परंतू हे सरकार सत्तेवर येताच हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास शंभर कोटीची मंजुरी मिळाली असून, हळद प्रकल्पाच्या उद्‍घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याची खासदार पाटील यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना करतानाच विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास सज्ज व्हा, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

नवीन निवडीत यांचा समावेश

शहरप्रमुख नांदेड दक्षिण ः तुलजेश यादव, महानगरप्रमुख नांदेड ः अशोक उमरेकर, उपजिल्हाप्रमुख ः गंगाधर बडुरे, तालुकाप्रमुख नांदेड दक्षिण ः उद्धव पाटील शिंदे, तालुकाप्रमुख अर्धापूर ः संतोष पाटील कपाटे, तालुकाप्रमुख भोकर ः अमोल धनराज पवार, तालुकाप्रमुख धर्माबाद ः आकाश रेड्डी, तालुकाप्रमुख उमरी ः सुभाष पेरेवार, शहरप्रमुख भोकर ः माधव बिल्लेवाड, शहरप्रमुख अर्धापूर ः सचिन येवले, शहरप्रमुख मुदखेड ः सचिन माने पाटील यांची निवड करण्यात आली.

Web Title: Nanded Mp Hemant Patil Shiv Sena Deputy Leader Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..