नांदेड : 'भारनियमाची' टांगती तलवार कायम

जिल्ह्यात भारनियमन सुरू; महावितरणकडे नियोजनाचा अभाव
MSEB Electricity
MSEB Electricity sakal

नांदेड : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यभरात वीजेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. नांदेड विभाग देखील त्यास आपवाद नाही. त्यामुळे जिल्ह्यावर भारनियमनाची अनिश्चित संकटाची टांगती तलवार कायम आहे. त्यातच महावितरणकडे नियोजनाचा अभाव दिसत असल्याने कोणत्याही वेळेला भारनियमन होत असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

नांदेड महावितरण विभागाकडे विभागनिहाय भारनियमाचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत. राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान यासारख्या राज्यात देखील नऊ ते १५ टक्क्यापर्यत वीजेची तुट असल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती असून, रात्री बे रात्री नांदेडकरांना कधीही भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात वीज चोरुन वापरणाऱ्या आकडे बहाद्दरांवर महावितरण विभागाच्या वतीने धडक आणि कडक कारवाई करण्यात येत आहे. हे महावितरण विभागासाठी चांगली गोष्ट आहे. मात्र, पूर्वी ज्या भागात भारनियमन किंवा वीज वितरण विभागाची कामे सुरु असतील त्या भागात नेमक्या कोणत्या आणि किती वेळासाठी विद्युत पुरवठा खंडीत होणार? या बद्दल प्रत्येक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर भारनियमनाचा संदेश पाठविला जात असे. मात्र सध्याची परिस्थिती बघता कुठल्याही भागात कधी भारनियमन केले जाईल, याचे कुठेही नियोजन केले गेले नाही. त्यामुळे नियमित वीज भरणा कऱणाऱ्या ग्राहकांना देखील भारनियमनाचा सामना करावा लागत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे.

जिल्ह्यातील अनियमित व अनिश्चित भारनियमनाच्या त्रासाला कंटाळून अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच पक्ष देखील आक्रमक होताना दिसत आहेत. रविवारी काही पक्ष संघटनांनी भारनियमनाच्या विरोधात कंदील मोर्चा काढून शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर महावितरण विभागाच्या वतीने सोमवारी दिवसभरात कुठेही भारनियमन केले नसल्याचा दावा केला आहे. मात्र, यावर नियमित वीज बील भरणा करणाऱ्या सामान्य ग्राहकांचे समाधान कसे करणार? याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.

आम्ही कधीच वीजेचे बील थकवले नाही. नियमीत वीज बिल भरणा करतो. तरी देखील आम्हाला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. भारनियमन नेमकी कोणत्या वेळेत होणार आहे. याबद्दलची पूर्व कल्पना देखील दिली जात नाही. त्यामुळे अनेक कामात अडथळा निर्माण होतो. किमान दैनंदिन कामात तरी अडथळा निर्माण होऊ नये.

- दिनकर कुलकर्णी, ग्राहक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com