नांदेड : दोन दिवसांपासून पळसपूर गावात वीजपुरवठा खंडित

अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा चोरट्यांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न
Nanded MSEB Palaspur Power supply cut two days
Nanded MSEB Palaspur Power supply cut two dayssakal

हिमायतनगर : पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत असून या मुळे शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा चोरट्यांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांच्या गस्तीमुळे चोरट्यांनी पळ काढला आहे. दोन दिवसांपासून विज पुरवठा बंद असल्यामुळे चोरटे सक्रिय होत आहेत. महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन तत्काळ विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पळसपुर येथील नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातील पळसपुर येथे दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांनतर पुन्हा शुक्रवारी रात्री देखिल चोरट्यांनी गावातील लाईट गेल्याची संधी पाहत अंधाराचा फायदा घेत गावात शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील तरुणांच्या सुरू असलेल्या गस्तमुळे चोरटे पळून लावण्यात यश आले आहे.

वीजपुरवठा सुरळीत नाही केल्यास आंदोलन : वाडेकर

पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून बंद असून यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. चोरट्यांच्या धास्तीने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीने लक्ष देऊन तात्काळ विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर नागरीकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन पाटील देवसरकर सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com