नांदेड : प्रभाग दहामधील नागरिक सुविधांपासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Municipal Drainage leaks damage roads in Ward Ten

नांदेड : प्रभाग दहामधील नागरिक सुविधांपासून वंचित

नांदेड : शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये सिमेंटचे पक्के रस्ते बनविले असून, ड्रेनेज लाईनचेही कामे झालेली आहेत. परंतु, प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना मात्र सुविधांपासून वंचित रहावे लागत असून, येथील नागरिक नगरसेवकांसह महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.

शहरातील इतर प्रभगांतील नागरिकांप्रमाणेच आम्हीही सर्व प्रकारचे महापालिकेला टॅक्स भरतो. परंतु, आम्हाला त्या तुलनेत काहीही सुविधा मिळत नाही. पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पाण्याचे तळे साचत असल्याने जा-ये करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तसेच ड्रेनेज लाईनही नादुरुस्त असल्याने त्यातील पाणीही पावसाच्या पाण्यात रस्त्यावर मिसळत असल्याने डास आणि दुर्गंधीशीही सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे आमच्या मरणयातना कधी थांबतील?, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना येथील नागरिकांनी विचारला आहे.

प्रभाग क्रमांक १० दत्त नगर भागात आज (ता.३१ जुलै) फेरफटका मारला असता, प्रभागाची दुर्दशा दिसून आली. आता तीन दिवसांपासून पाऊस थांबलेला असतानाही, रस्त्यांवर पाण्याचे तळे अद्यापही साचूनच आहेत. ड्रेनेजची कामे करणारे कामगार कॉल केला की येतात. जेवढे जमेल तेवढे काम करतात आणि निघून जातात. पुन्हा तीच समस्या भेडसावते. विशेष म्हणजे विद्यमान नगरसेविका अलका जगदीश शहाणे व माजी नगरसेवक श्री. साखरे यांच्या घरासमोरच पावसाच्या पाण्याचे तळे साचलेले असताना, इतर नागरिकांची काय अवस्था असेल हे वरील छायाचित्रांवरून लक्षात येईल.

नांदेडच्या विकासासाठी 150 कोटी रुपये आले, पण हा अविकसित भाग का दिसून आला नाही, असा प्रश्न मी सभागृहात विचारला तर अनेकांना मिर्च्या झोंबतात. हिंगोली गेट पासून ते संपूर्ण दत्तनगरचा भाग मित्रनगर, बालाजी नगर, गोविंदनगर, सखोजी नगर, शिवनगर, तानाजी नगर, नंदिग्रामचा एरिया, विनायकनगर येथील भागाला मूलभूत सोयीसुविधा केव्हा मिळतील?

- बापूराव गजभारे, नगरसेवक

Web Title: Nanded Municipal Drainage Leaks Damage Roads In Ward Ten Citizens Inconvenience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..