Nanded : जिल्ह्यातील देवी मंदिरे घटस्थापनेसाठी सज्ज

पूर्वसंध्येला बाजारपेठही गजबजली सार्वजनिक मंडळांनी खबरदारी घेणे आवश्यक
navratri
navratrisakal

नांदेड : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेच्या मंत्रघोषात आजपासून (ता.२६) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी घटस्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन वर्षानंतर यंदा मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठही सजली आहे. पूजेच्या सामानासह घटाच्या आराशीचे साहित्य भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात देवीचा जागर, कुमारी पूजन, कुंकूमार्चन असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम उत्साहात होतात. दोन वर्षांपासून करोनाचे सावट कायम असल्याने नवरात्रोत्सवातही कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भाविकांना उत्सव काळात देवी मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. मात्र नवरात्रोत्सवात यंदाही गरबा आणि दांडीयाला परवानगी नसल्याने दांडिया प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. शिवाय भरमसाठ महागाईमुळे नागरिकांतून खरेदीसाठी फारसा उत्साह दिसून येत नाही. फराळांच्या वस्तुंचे दर अगोदरच कडाडले आहेत. दुसरीकडे, घटस्थापनेसाठी लागणारा मातीचा कलश, पूजेची फुले, पाने, पाटी, देवीसाठी ओढणी यासह अन्य साहित्य, वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर एकत्र येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे या काळात राज्य सरकारने गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना शासनातर्फ दिल्या आहेत. त्यानुसार नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा आणि जिल्‍ह्यात सर्वत्र कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी म्‍हणून जिल्‍हा प्रशासनामार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात आली आहे.

अशा आहेत सूचना

दुर्गा देवींच्‍या स्‍थापने पूर्वी मंडळाच्‍या संयोजकांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त नांदेड आणि संबंधीत पोलिस ठाण्याकडून रितसर परवानगी घ्‍यावी.

विना नोंदणी व विना परवाणगी मंडळाने दुर्गा देवींची स्‍थापना करु नये.

मुर्तीची स्‍थापना तसेच दांडीया/गरबा सार्वजनिक रस्‍त्‍यांवर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी करु नये.

मुर्ती स्‍थापनेची तसेच दांडीया/गरबा खेळण्‍याची जागा आणि परिसर स्‍वच्‍छ असावा. त्‍या ठिकाणी प्रकाशाची भरपूर सोय केलेली असावी.

दुर्गा देवीच्‍या मुर्तींच्‍या संरक्षणाची जबाबदारी संबंधीत मंडळाचे अध्‍यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर सोपविण्‍यात यावी.

स्‍थापनेच्‍या ठिकाणी या साठी २४ तास कार्यकर्त्‍यांची चक्राकार पध्‍दतीने नियुक्‍त्‍या कराव्‍यात.

उत्‍सव कालावधीत वापरण्‍यात येणा-या ध्‍वनिक्षेपकाची परवानगी संबंधीत पोलीस ठाणे येथुन घ्‍यावी.

ध्‍वनीक्षेपकाच्‍या आवाजामुळे रुग्‍णास, विद्यार्थ्‍यांस व परिसरातील सर्वसामान्‍य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्‍यावी.

मंडळाकडून दाखवण्‍यात येणा-या देखाव्‍यामुळे इतर धर्मियांच्‍या भावना दुखवल्‍या जाणार नाहीत, असेच देखावे उभे करावेत.

मंडळातर्फे आयोजीत करण्‍यात येणा-या मनोरंजन व सांस्‍कृतीक कार्यक्रमांची तसेच गरभा, दांडीया यासाठीची परवानगी संबंधीत पोलिस ठाण्याकडून घ्‍यावी.

विसर्जन मिरवणूकीत वापरात येणारी वाहने चांगली व सुस्थितीत असावी. त्‍याची तपासणी नांदेड शहरासाठी प्रदेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडून करून घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com