नांदेड : जाळीत गुदमरतोय कांद्याचा जीव

जिल्ह्यात कांद्याला भाव मिळेना : शेतकरी हवालदिल
Nanded Onion prices not in market Farmers oj05
Nanded Onion prices not in market Farmers oj05sakal

नांदेड : शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामास जोमाने लागले असून, सर्वत्र शेत नांगरणीची कामे आटोपली आहेत. परंतु, घसरलेल्या कांद्याच्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे खरीप पिकांसाठी आर्थिक नियोजन कसे करावे?, या चिंतेत शेतकरी सापडले आहेत.

खर्च भागवताना शेतकरी कर्जबाजारी झाला असून, आगामी खरिपाचे नियोजन कसे करावे?, ही समस्या आता शेतकऱ्यांपुढे उभी राहिलेली आहे. कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा घेण्यासाठी कुणी तयार होईना, तर वाढत्या उष्णतेमुळे खराब व सडलेला निम्मा कांदा शेतकऱ्यांना फेकावा लागत आहे. कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही शेतकऱ्यांचा निघत नसल्याने आगामी खरिपाचे नियोजन कसे करावे?, ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.

सध्या कांदा हाच एकमेव आर्थिक स्त्रोत देणारा घटक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नवीन कांद्यांची आवक सुरु झाल्याने गेल्या दोन ते तीन दिवसात कांद्याचे भाव कमी झालेले आहे. गेल्या आठवड्यात ६०० ते ८०० रुपये (४० किलो) कांद्याच्या पोत्याचे दर होते. ते २०० ते ३५० रुपयावर आलेले आहे.

जाळीतल्या कांद्याला भाव मिळेना

जाळीतल्या कांद्याला व्यापारी भाव देईनासे झाल्याने दरवर्षी साठवलेला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. यंदाही काहीसे असेच चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी कांद्याचे पडलेले भाव आणि त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हे समीकरण पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी जाळीतला कांदा शेतकऱ्याने बाजारात आणायला खरा, मात्र त्या कांद्याला व्यापारी भाव देईनासा झाल्याने आता या कांद्याचे करायचे काय?, अशा विचारात शेतकरी आहे.

साठविलेला कांदा बाजारात आणल्यावर शेतकऱ्याला बाजारात त्या कांद्याच्या प्रतिप्रमाणे अत्यंत कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

- प्रकाश सूर्यवंशी, कांदा उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com