नांदेड : शिवणी परिसरात शंभर टक्के कापसावर बोंड अळीचा प्रादु्र्भाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

अतिवृष्टी व असंतुलित वातावरणामुळे खरिपाची पिके शेतकऱ्याच्या हातून गेली आहेत या परिसरात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन अशी पिके घेतली जातात कापसासारखे  नगदी पीक बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नष्ट झाली आहे

शिवणी (जिल्हा नांदेड )-  किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस पिकाचे 100% बोंड आळी झाल्याने  शेतकरी हिरवीगार असलेल्या कापूस पिकात एक तर जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत तर काही शेतकरी पराठी उपटुन टाकताना दिसत आहेत

अतिवृष्टी व असंतुलित वातावरणामुळे खरिपाची पिके शेतकऱ्याच्या हातून गेली आहेत या परिसरात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन अशी पिके घेतली जातात कापसासारखे  नगदी पीक बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नष्ट झाली आहे  शिवणी व परीसरात सिंचणाचे क्षेत्र कमी असल्यामुळे या भागातील शेतकरी कापुस,सोयाबिनची पिके घेतली जातात कापसासारखे नगदी पिक बोंडअळीणे नष्ट झाल्याणे या भागातील शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे कापूस वेचणीसाठी दहा रुपयाचा दर द्यावा लागतो.

हेही वाचा सुखद बातमी : व्हॉटसॲप ग्रुपची अशीही संवेदनशीलता, त्या कुटुंबाला दिले २६ हजार ६०० रुपये व मोफत औषधी -

शेतकऱ्यांना अगोदरच कमी प्रमाणात निघत असलेल्या कापसाला वेचणीसाठी मजूरला दहा रुपये किलो प्रमाणे दर द्यावा लागत आहे मजुरांच्या कमतरतेमुळे कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने मजूर मागतात ते तर त्यांना द्यावा लागत आहे असे शेतकरी सांगताना दिसत आहेत जवळच्याच तेंलगणात कापूस वेचणीला मजूर लोंढेच्या लोंढे जाताना दिसत आहेत का तर त्यांना राहण्याची व खाण्यासाठी तांदूळ व येण्या-जाण्याचा खर्च तेथील शेतकरी देत असल्यामुळे या भागात कापूस वेचणीला मजूर मिळेनासे झालेत पहिल्या वेचणीचा कापूस विकावा लागला 4 हजार रुपये दराने सुरुवातीला फुटलेला कापूस पावसामुळे थोडा ओला झाल्याणे ते कापूस घरात ठेवणे अवघड झाल्याने व्यापारी आद्रतेचे कारण देऊन चार हजार दरांनी खरेदी केला आहे. शेतकऱ्यांना  नाविलाजाने  आपला कापूस चार हजारच्या दराने विकावा लागला त्यामुळे आता शेतकऱ्याकडे कापसाचे पिकच  शिल्लक नाहीत्यामुळेे शेतकऱ्याचे वर्षाचे गणित कोलमडले आहे  शासनाने धान पिकाला जसा बोनस जाहीर केला त्याप्रमाणे कापूस पिकाला ही बोनस जाहीर करून शेतकर्‍यांना थोडा का होईना दिलासा द्यावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

 

संपादन - प्र्ल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Outbreak of Bond larvae on 100% cotton in Shivani area nanded news