किन्नरांसाठींचा नांदेड पॅटर्न पथदर्शी ठरेल; अशोक चव्हाण

पालकमंत्री अशोक चव्हाण; जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम
 Ashok Chavan
Ashok Chavansakal

नांदेड : भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिली आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. २८) व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्‍घाटन व या इमारतीत किन्नरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत प्रमाणपत्राचे हस्तांतरण, जिल्ह्यातील ३४ किन्नरांना मतदान ओळखपत्राचे वाटप पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी उपस्थित होते.

माणूस म्हणून जगण्यासाठी आजही किन्नरांना संघर्ष करावा लागतो. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रशासनाच्यावतीने यथाशक्य प्रयत्न करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता. तोही आता मार्गी लागला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डपासून प्रत्येक बाबीला लागणारे पुरावे

हे तृतीयपंथीयांकडे, किन्नरांकडे उपलब्ध असतील, हे सांगता येत नाही. त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका यांनी संयुक्त प्रयत्नांतून किन्नरांना निवडणूक कार्डपासून इतर प्रमाणपत्र, त्यांच्या निवासाचा प्रश्न आदी बाबींचा विचार करून जी मोहिम हाती घेतली आहे ती कौतुकास पात्र असल्याचे गौरोद्गार श्री. चव्हाण यांनी काढले. यावेळी किन्नर गौरी बक्ष हिने पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. नांदेड जिल्ह्याने आमच्यासाठी वेगळे व आवश्यक कार्य करून जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सर्व किन्नरांच्या वतीने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com