नांदेड पोलिस दलाला जबर हादरा; सहाय्यक फौजदाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू

जिल्ह्यातील सातव्या पोलिसांचा बळी गेला आहे. बिलोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान वाघमारे यांना कर्तव्यावर असताना कोरोनाचा संसर्ग झाला.
भगवान वाघमारे
भगवान वाघमारे

नांदेड : कोरोना (Corona virus) विषाणूने संबंध जगाला व महासत्ताना वेठीस धरले आहे. अद्याप या संसर्गावर कुठलाच रामबाण ईलाज आला नाही. या संसर्गाला हारविण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे व काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे. या संसर्गाने अनेकांचा बळी जात आहे. त्यात फ्रन्ट लाईनवर काम करणारे पोलिसही सुटले नाहीत. नांदेड पोलिस दलालाही (Nanded police) जबर हादरे बसत असून आजपर्यत सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात बिलोली येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भगवान वाघमारे (Bhagvan waghmare) यांनाही कोरोनाने गुरुवारी (ता. सहा) रात्री आपल्या कवेत घेतले. ते एक मनमिळावू अधिकारी असल्याचे बोलल्या जात आहे. Nanded police force shaken; Assistant magistrate dies of corona infection

त्यांच्या मृत्यूबद्दल पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी शोक व्यक्त केला.

जिल्ह्यातील सातव्या पोलिसांचा बळी गेला आहे. बिलोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान वाघमारे यांना कर्तव्यावर असताना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. भगवान वाघमारे यांनी यापूर्वी भाग्यनगर, मांडवी, धर्माबाद, मुख्यालय येथे सेवा केली होती.

हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा; महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच

भगवान वाघमारे हे मूळचे बळीरामपुर (ता. नांदेड) सिडको येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पोलिस भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे बंधू नायगाव पोलिस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर कालच अंतिम संस्कार करण्यात आले. सध्या जिल्ह्यातील पोलिस दलातील 525 पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पोलिस दलातील यांचा झाला मृत्यू

भगवान वाघमारे यांचा मृत्यू सातव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी बालाजी तुकाराम ढगे पोलिस मुख्यालय नांदेड, संतोष माधवआप्पा मठपती मांडवी, गंगाधर आलुरे मुक्रमाबाद, किरणवीर बालाजी तेलंगे मुदखेड, भाऊराव शामराव राऊत पोलीस मुख्यालय, मीरा नारायण उठवले इतवारा यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com