esakal | नांदेड : अर्धापूर पोलिसांना मिळणार हक्काचा निवारा, तब्बल 82 वर्षाने होतेय बांधकाम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अर्धापूर शहर हे पोलिस अभिलेखात एक संवेदनशील शहर म्हणुन नोंद आहे. देशात घडलेल्या घटनांचे पडसाद शहरात उमटतात. त्यामुळे येथील पोलिस यंत्रणा सतर्क राहून वेळेवर कुमक मिळणे आवश्यक असते. पोलिसांची अपुरे निवासस्थाने तेही जीर्ण झालेली होती. नवीन प्रशासकीय ईमारत व निवासी घरे बांधण्याची मागणी करण्यात येत होती.

नांदेड : अर्धापूर पोलिसांना मिळणार हक्काचा निवारा, तब्बल 82 वर्षाने होतेय बांधकाम

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील 82 वर्षाची निजाम कालीन पोलिस ठाण्याची ईमारत पाडून नविन ईमारत व निवासी असे 43 गाळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून पोलिस कर्मचारी व अधिका-यांना लवकरच हक्काचा निवारा मिळणार आहे. हे काम प्रगतीपथावर असल्यामुळे पोलिस कर्मचा-यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नविन बांधकामात पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस ठाणे आशा ईमारती राहणार आहेत. तिन्ही बांधकाम एकचवेळी सुरु आहे.

अर्धापूर शहर हे पोलिस अभिलेखात एक संवेदनशील शहर म्हणुन नोंद आहे. देशात घडलेल्या घटनांचे पडसाद शहरात उमटतात. त्यामुळे येथील पोलिस यंत्रणा सतर्क राहून वेळेवर कुमक मिळणे आवश्यक असते. पोलिसांची अपुरे निवासस्थाने तेही जीर्ण झालेली होती. नवीन प्रशासकीय ईमारत व निवासी घरे बांधण्याची मागणी करण्यात येत होती.

शहरातील पोलिस पाण्याची ईमारत व निवासे घरे 1938 मध्ये निजामाच्या राजवटीत बांधण्यात आली होती. पोलिस कर्मचारी व अधिका-यांची अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्हाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून जनतेचे रक्षक असलेले पोलिसांसाठी निवासी घरे व प्रशासकीय ईमारतीसाठी सुमारे साडेबारा कोटीच्या निधी मंजूर केला. या बांधकामाचे भूमीपुजन त्यांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.

हेही वाचा - नांदेड : अर्धापूरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्‍वच्‍छता; ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा केला संकल्प -

अर्धापूर पोलिस ठाण्यात सुमारे 70 पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. यात पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरिक्षक,नऊ सहायक पोलिस उपनिरिक्षक, 17 नाईक, 14 शिपाई ,तीन महिला जमादार यांचा समावेश आहे. या अधिकारी व कर्मचा-यांना शासकीय निवास्थान नसल्यामुळे नांदेड, अर्धापूर येथे किरायाच्या घरात रहावे लागत होते. त्यामुळे कठीणप्रसंगी खुप मोठी धावपळ करुन कर्तव्यावर हजर रहावे लागत होते.

शहरातील मध्यभागी असलेल्या पोलिस ठाण्याच्या जागेत ही नवीन वास्तु सुमारे साडेबारा कोटी खर्च करुन बांधण्यात येणार आहे. यात प्रशासकीय ईमारत, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थाने राहणार आहेत. ही वास्तु अर्धापूरच्या वैभवात भर घालणारी असून ती लवकरच पुर्ण होईल असा विश्वास कंत्राटदार श्री. पटणे यांनी व्यक्त केला.

शहरातील पोलिस ठाणे व निवासी गाळ्यांचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. यात सहा ईमारती असून यात एक पोलिस ठाणे, एक पोलिस निरीक्षक यांचे निवासस्थान, पाच सहकारी अधिकारी, 36 पोलीस कर्मचा-यासाठी निवास्थाने राहणार आहेत. हे बांधकाम जुन 2021 पर्यंत पुर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेन्द्र बिराजदार यांनी दिली.

शहरातील पोलिस ठाण्याची ईमारत व निवासी घरे जिर्ण झाली होती. शिवाय हे घरे अपुरी होती. पोलिस कर्मचारी व अधिका-याना किरायाच्या घरात राहावे लागत असल्यामुळे खुप धावपळ होते. ही धावपळ आता थांबणार असून कर्मचारी व अधिका-यांची सोय होणार आहे. अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image