नांदेड - नऊ तासाच्या परिश्रमानंतर जंगमवाडी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळित 

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड - शहरातील १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ११ केव्ही पावडेवाडी आणि ११ केव्ही गजानन मंदिर परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. शुक्रवारी (ता. दोन) महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नऊ तासाच्या परिश्रमानंतर अखेर वीज पुर्ववत करण्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.   

गुरूवारी (ता. एक) दुरूस्तीचे नियोजित काम करण्यासाठी शहरातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा सकाळी अकरा ते दुपारी दोन  वाजेपर्यंत खंडीत करण्यात आला होता. संबंधित ग्राहकांना याबाबत महावितरणच्या संगणकीय प्रणालीतून एसमएमसही पाठवण्यात आले होते. देखभाल दुरूस्तीचे काम पुर्णत्वास येत असतानाच दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे १३२ केव्ही इलीचपुर उपकेंद्रातून वीजपुरवठा खंडीत झाल्याने ३२ केव्ही सीआरसी व विद्यूतभवन उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या आयटीआय, शिवाजीनगर आदी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी सहा वाजता सुरू झाला.

पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठीच चार तासांचा अवधी 

दरम्यान, १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ११ केव्ही पावडेवाडी आणि ११ केव्ही गजानन मंदिर वीज वाहिनीवरील तरोडा नाका, वामननगर, मालेगाव रोड आदी परिसरातील वीजपुरवठा दुपारी चार वाजता खंडीत झाला. दुसरे पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठीच चार तासांचा अवधी लागला. महत प्रयासानंतर उभे केलेले पॉवर ट्रान्सफॉर्मर चार्ज करताच नादुरूस्त झाले.  संततधार पावस सुरू होता. त्यामुळेही वीजपुरवठा पुर्ववत करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. 

नऊ तास परिश्रम

नांदेड शहर विभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी पडत्या पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्न करत होते. नादुरूस्त झालेले रोहीत्र तग धरत नसल्याने अखेर ११ केव्ही पावडेवाडी आणि ११ केव्ही गजानन मंदिर वीज वाहिनीवरील विद्युतभार दुसऱ्या वीज वाहिनीवर घेवून नऊ तासाच्या अविश्रांत मेहनतीनंतर रात्री अकरा वाजता सर्व परिसराचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात महावितरणला यश मिळाले. नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. औरादे आणि पावडेवाडी उपविभागाचे अभियंता सिध्दार्थ पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com