निवडणूक आली की आठवते जात : प्रकाश आंबेडकर

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीवर टीका
अॅड. प्रकाश आंबेडकर  
अॅड. प्रकाश आंबेडकर  sakal

देगलूर : निवडून आलेले राजे होत नाहीत तर ते जनतेचे कायम सेवक असतात. पण आपण त्यांना राजे समजू लागलो. लोकशाहीच्या या विटंबनेला काहीअंशी मतदारही जबाबदार आहेत. निवडणुका आल्या की काँग्रेस असो अथवा भाजप, राष्ट्रवादीला जात समूहाची आठवण येते. लोकशाहीवरील त्यांचे प्रेम वेगळे असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २५) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अंजलीताई आंबेडकर, रेखाताई ठाकूर, सविताताई मुंडे, फारुक अहमद, सिद्धार्थ मोकळे, अशोक सोनवणे, अमित भुईगळ, गोविंद दळवी, अनिल जाधव, सरोजित बनसोडे, डॉ. इंगोले, ॲड अविनाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

अॅड. प्रकाश आंबेडकर  
नागपूरमध्ये नको मंत्र्यांना अधिवेशन; म्हणे आणखी खर्च कशाला?

मी १९८६ मध्ये लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी नांदेडच्या लोकांनीच मला निवडणुकीत उभे केले होते. त्याचे कारण मी सांगणार नाही, असे मी खुद्द शंकरराव चव्हाण यांना सांगितले होते. शंकरराव चव्हाण एक विकासाभिमुख ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या चांगल्या गुणांचे त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी अवलोकन करावे, असा सल्ला ॲड. आंबेडकर यांनी दिला. ‘वंचित’ची बदनामी केल्यास कार्यकर्ते मोर्चा घेऊन गेले तर आपले अनेक घोटाळे बाहेर येतील. तेव्हा सासू, पत्नी सोबत तुम्हालाही न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तेव्हा कॉंग्रेस कुठे गेला होता?

मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचे न्यायालयाने सूचित केले पण यांना द्यायचेच नाही. आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवून फक्त सत्ता हस्तगत करायची आहे. या भागातील अनेक प्रश्नाबरोबर आदिवासींच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे. निजामाच्या यादीमध्ये जे आदिवासी होते, ती यादी जशीच्या तशी स्वीकारली गेली असती तर आज येथील आदिवासी समजल्या जाणाऱ्या कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी आल्या नसत्या. मातंग समाजाला उमेदवारी दिल्याचे कॉंग्रेसकडून सांगितले जाते, मात्र मातंग समाजाच्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या काँग्रेस कुठे गेला होता? भाजपनेही मुखेडच्या महाराजांना तिकीट देतो म्हणून तीन महिने झुलवले. अखेर आयात उमेदवाराला तिकीट देऊन त्या महाराजांचा अपमान केला. किनवटसारखी परिवर्तनाची संधी आता देगलूरच्या जनतेला मिळाली आहे. ती दवडू नका, असे आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com