नांदेड : कुमारी नीलिमा सावंत यांच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या- चर्मकार संघटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

टोळी ता.पारोळा जि.जळगाव येथे वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करून खून झाला. त्याचा निषेध म्हणून चर्मकार समाजाच्या वतीने निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, मराठवाडा युवा सचिव संजय सोनटक्के, युवा जिल्हाध्यक्ष संदीप गोरे, शहराध्यक्ष सुरेश शेळके, युवा शहराध्यक्ष मनोज काकडे, केके गंगासागरे, प्राध्यापक आर एन गंगासागरे, गोविंद कोलंबीकर, संजय शेळके, सुरेश सांगवीकर, विशाल वाघमारे, बनसोडे गायकवाड, विश्वनाथ वाडेकर, श्रीकांत अन्नपूर्ण आदी उपस्थिती होती

नांदेड : कुमारी नीलिमा सावंत यांच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या- चर्मकार संघटना

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जळगाव जिल्ह्यातील तालुका तो पारोळा गाव या गावात महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली कुमारी नीलिमा ही दिवाळीनिमित्त आपल्या मामाच्या गावी पारोळा येथे गेले असताना तेथील काही गाव गुंडांनी तिच्यावर सामूहिक अमानुष बलात्कार करून तिला विष पाजून गावातील बस स्थानका शेजारील अडगळीत तिचा मृत्यू झाला असे समजून फेकून दिले पण जेव्हा त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर तिचा दुर्दैवी अंत झाला चर्मकार समाजावर झालेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ या घटनेचा जाहीर निषेध करत आहे

कुमारी नीलिमा सावंत तिच्यावर सामुहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी कुमारी नीलिमा सावंत हिचा कुटुंबाचे पुनर्वसन शहरात करण्यात यावे व त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे .ज्या पोलिसांनी कुमारी नीलिमा ावंत हिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही त्या सर्व पोलिस कर्मचार्‍यांसह आरोपी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच परळी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील चर्मकार समाजाच्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.चर्मकार समाजाच्या बहिणीला न्याय नाही मिळाला तर दिवाळीनंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघ रस्त्यावर उतरण्यास देखील तयार आहे

हेही वाचा - नांदेड : पिस्तुलधारी युवकास अटक, नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई -

अत्याचार करणाऱ्या दोषींवर व आरोपींना पाठीशी घालत असणाऱ्या पोलिस प्रशासनावर तात्काळ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी  यांना गुरुवार (ता. १२) रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्फत देण्यात येणार आहे असे निवेदन देताना *राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, मराठवाडा युवा सचिव संजय सोनटक्के, युवा जिल्हाध्यक्ष संदीप गोरे, शहराध्यक्ष सुरेश शेळके, युवा शहराध्यक्ष मनोज काकडे, के के गंगासागरे, प्रा. आर एन गंगासागरे, तालुका गोविंद कोलंबीकर, संजय शेळके सांगवीकर, सुरेश वाघमारे, विशाल बनसोडे, गायकवाड विश्वनाथ वाडेकर, श्रीकांत अन्नपूर्ण आणि समाज बांधवांची उपस्थिती होती

loading image
go to top