नांदेडला थोडासा दिलासा : शुक्रवारी ४३ रुग्ण बरे तर ३९ बाधित, संख्या ११६९ वर पोहचली

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवार (ता. २४) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ३९ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ४३ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २३ जुलैच्या रोजी गोवर्धनघाट परिसरातील ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६१ एवढी झाली आहे. यात ५४ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ४५८ अहवालापैकी ३९१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार १६९ एवढी     झाली आहे. यातील ६५३ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४५१ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात चार महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे.

आज बरे झालेल्या ३६ बाधित बरे

आज बरे झालेल्या ३६ बाधितांमध्ये धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील तीन, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील तीन, देगलूर चार, बिलोली एक, गोकुंदा दोन, पंजाब कोविड केअर सेंटर येथील १०, मुखेड १८, खासगी रुग्णालयातील दोन बाधिताचा यात समावेश आहे.

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील आनंदनगर दोन, शक्तीनगर एक, पांडूरंगनगर एक, एमजीएम काॅलेज रोड एक, सि़डको एक, विसावानगर एक, राहूल काॅलनी एक, दिलीपलिंग काॅलनी एक, वजिराबाद दोन, हडको दोन, ग्रामीण रुग्णालय भोकर एक, रिठा ता. भोकर एक, मरखेल ता. देगलुर एक, सुंदरनगर एक, भाग्यनगर एक, पद्मजा सिटी एक, गणेशनगर एक, शारदानगर देगलूर एक, खैरका ता. मुखेड एक, मुक्रमाबाद दोन, शिवाजीनगर मुखेड तीन, धनज ता. मुदखेड एक, बालाजीगल्ली धर्माबाद एक, धर्माबाद शहर एक, नविन मारोती मंदीर कंधार एक, चोंढी जिल्हा परभणी एक, गंगाखेड दोन, बसस्थानक ता. अहमदपूर जिल्हा लातूर एक, विनायकनगर हिंगोली एक, गोकुळधाम भावसारचौक नांदेड एक, खतगाव ता. बिलोली एक, वसमत हिंगोली एक. 

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४५१ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ९७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १९१, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे तीन, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २४, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १६, उमरी नऊ, हदगाव कोविड केअर सेंटर दोन, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे एक, लोहा कोविड केअर सेंटर येथे १३, कंधार कोविड केअर सेंटर येथे ११, भोकर एक, खाजगी रुग्णालयात ४० बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ४८७
घेतलेले स्वॅब- ११ हजार ७४३
निगेटिव्ह स्वॅब- ९ हजार ३२६
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ३९
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ११६९
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-१३,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-१३
मृत्यू संख्या- ६१,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ६५३,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४५१,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४५९.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com