नांदेड : शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद नाही

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कमी जास्त होत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकदम शुन्यावर
नांदेड : शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद नाही
नांदेड : शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद नाहीsakal

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कमी जास्त होत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकदम शुन्यावर आली आहे. शनिवारी (ता.१६) प्राप्त झालेल्या ६६४ अहवालापैकी ६६१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ३५२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ६८० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला २० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड : शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद नाही
राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय; मार्च नंतर निच्चांकी संख्येची नोंद

आज २० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी- चार, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण -१६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह :

९० हजार ३५२

एकूण कोरोनामुक्त :

८७ हजार ६८०

एकूण मृत्यू: दोन हजार ६५२

शनिवारी पॉझिटिव्ह : शून्य

शनिवारी कोरोनामुक्त : एक

शनिवारी मृत्यू : शुन्य

उपचार सुरु : २०

अतिगंभीर प्रकृती : तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com