नांदेड : पीकविम्याचा दुसरा हप्ता रखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo
नांदेड : पीकविम्याचा दुसरा हप्ता रखडला

नांदेड : पीकविम्याचा दुसरा हप्ता रखडला

नांदेड: मागील खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना पहिला हप्त्याचे वितरण झाले. परंतु उर्वरीत परतावा अद्याप मिळाला नाही. याबाबत कृषी विभागाच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने विमा कंपनीला त्यांचा हिस्सा जमा केला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा परतावा रखडल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Nanded : अर्धापुरात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोठा मोर्चा

खरिप हंगाम २०२१-२०२२ मध्ये जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ९४१ अर्जदार शेतकऱ्यांनी उडीद, मुग, तूर, कापूस, ज्वारी व सोयाबीनसाठी ४४ कोटी ९५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २९४ कोटी ९२ लाख ४७ हजार ९०१ रुपयानुसार विमा कंपनीकडे ६३० कोटी ८० लाख ३४८ रुपयांचा विमा हप्ता जमा झाला होता. यातून पाच लाख १६ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र संरक्षीत करण्यात आले होते. तर विमा संरक्षीत रक्कम दोन हजार १६२ कोटी ८६ लाख निर्धारीत करण्यात आली होती.

हेही वाचा: Nanded : मुलीच्या भविष्याच्या चिंतेने सालगड्याने केली आत्महत्या

दरम्यान सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीने स्थानिक नेसर्गीक आपत्ती घटकांतर्गत सात लाख ३५ हजार ८११ अर्जदार शेतकर्‍यांना ४६१ कोटींचा पिकविमा परतावा मंजूर झाला होता. यापैकी ७३ टक्क्यानुसार ३३० कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला. परंतु अद्याप २७ टक्क्यानुसार ३३१ कोटींचा विमा रखडला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

विमा कंपनी, राज्य सरकारच्या

भांडणात शेतकरी भरडले

नुकसानग्रस्तांना विमा परताव्याचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याबाबत माहिती घेतली असता कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापन्याच्या अटीवर माहिती दिली. २०२०-२०२१ मध्ये राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधीक नुकसान झाल्यामुळे एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई दिली होती. हा निकष ग्राह्य धरुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना परतावा द्यावा, असा आग्रह धरला. परंतु विमा कंपनी पिक कापणी प्रयोगाच्या आलेल्या उत्पादकतेनुसार विमा परतावा नाकारला आहे. यामुळे शासनाने मागील वर्षीचा हप्ताही विमा कंपनीला दिला नाही. तसेच २०२१-२०२२ मधीलही शासनाचा हिस्सा रखडल्यामुळे पिकविमाधारकांना दुसरा हप्त्यासाठी विलंब होत असल्याचे सांगीतले.

Web Title: Nanded Second Installment Crop Insurance Delayed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top