esakal | नांदेडात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल , शुक्रवारी ७६ जण पॉझिटिव्ह ः ३७ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शुक्रवारी एक हजार ४२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक हजार ३०१ निगेटिव्ह, ७६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८४९ वर पोहचली आहे.

नांदेडात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल , शुक्रवारी ७६ जण पॉझिटिव्ह ः ३७ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होताना दिसत होती. त्यामुळे दिवाळीपर्यंत जिल्ह्यातुन कोरोना हद्दपार होईल अशी शक्यता देखील वर्तविली जात होती. मात्र दिवाळीनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (ता.२०) ३७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

गुरुवारी (ता.१९) पतापासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी एक हजार ४२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक हजार ३०१ निगेटिव्ह, ७६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८४९ वर पोहचली आहे. गंभीर प्रकृती असलेल्या बाधितापैकी मागील दोन दिवसात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोनानी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५४३ वर स्थिर आहे. असे असले, तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णसंख्येत घट होण्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा- माहूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसुचित जमातीकरिता आरक्षीत ​

२९१ पॉझिटिव्ह रुग्णांवर औषधौपचार सुरू 

शुक्रवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - तीन, जिल्हा रुग्णालयातील - तीन, महापालिकेच्या ताब्यातील एनआरआय भवन व गृहविलगीकरण कक्षातील मिळून - १४, देगलूर - सहा, मुखेड - एक आणि खासगी रुग्णालयातील - दहा असे ३७ कोरोनाबाधित रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १८ हजार ८१९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २९१ पॉझिटिव्ह रुग्णांवर औषधौपचार सुरू असून, त्यापैकी १७ करोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

६५८ स्वॅब अहवालाची तपासणी सुरू 

नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात - ५८, नांदेड ग्रामीण - तीन, अर्धापूर - तीन, किनवट - एक, लोहा - एक, नायगाव - दोन, भोकर - पाच आणि मुखेड - तीन असे ७६ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १९ हजार ८४९ इतकी झाली आहे. यापैकी १८ हजार ८१९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या २९१ रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामधील १७ पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ६५८ स्वॅब अहवालाची तपासणी सुरू होती. त्यामुळे शनिवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

कोरोना मीटर ः 

शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ७६ 
शुक्रवारी कोरोनामुक्त रुग्ण - ३७ 
शुक्रवारी मृत्यू - शन्य 
एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या - १९ हजार ८४९ 
एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ८१९ 
एकूण मृत्यू - ५४३ 
उपचार सुरु - २९१ 
गंभीर रुग्ण - १७ 
स्वॅब अहवाल प्रलंबित - ६५८