नांदेड : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी उतरविला मालवाहकांचा विमा

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम

नांदेड : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने मालवाहक आणि चालकांचा विमा उतरविण्यात आला आहे. दोनशेहून अधिक मालवाहक आणि चालकांचा यावेळी विमा उतरविण्यात आल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

श्री. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर लोकसेवेसाठी सतत संघर्ष करत राहिले. महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी त्यांनी  शेतकरी कामगार शेतमजूर यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना महाराष्ट्राला दिली. आजही महाराष्ट्रातील तळागळातील लोकांसाठी काम करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. श्री. ठाकरे यांच्या विचाराला अनुसरुन सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी नवा मोंढा येथील मालवाहक आणि ट्रक, टेम्पो चालकांचा अपघाती विमा उतरविला. 

हेही वाचामाहूरच्या रेणुका मंदीर विश्वस्तात व पुजेसाठी महिलांना स्थान द्यावे- तृप्ती देसाई

एक लाख रुपये किमतीचा विमा उतरल्यानंतर विमा पॉलिसी प्रत्येक चालक आणि मालकाच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांचे हस्ते या पॉलिसीचे वितरण करण्यात आले. 

यावेळी संयोजक दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील तिडके बोंढारकर, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश मारावार, शहरप्रमुख सचिन किसवे, पिंटू पाटील वासरीकर, श्याम वानखेडे, रमेश पाटील कोकाटे, माधव पाटील कोकाटे, चंद्रकांत पवार, व्यंकटराव कोकाटे, गजानन कोकाटे, श्याम दत्ता पाटील कोकाटे, आनंदा शिंदे, अमोल औसेकर, बालाजी मुंगळे, शेख सादिक, सौरभ चव्हाण, मुन्ना राठोड, अॅटो सेना जिल्हा प्रमुख जनार्दन गोंडवड, भिमराव ससाणे, योगेश वानखेडे, दिगंबर नरवर, खंडू भातनाते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Shiv Sena district chief Datta Kokate has taken out cargo insurance nanded news