Nanded : जिल्ह्यातील एकाधिकारशाहीला कंटाळलो

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणेंची प्रतिक्रिया, आज भाजप प्रवेश
Nanded : जिल्ह्यातील एकाधिकारशाहीला कंटाळलो
Nanded : जिल्ह्यातील एकाधिकारशाहीला कंटाळलोsakal News

देगलूर : मी ज्या पक्षात वाढलो, घडलो, त्या पक्षाबद्दल अथवा पक्षप्रमुखांबद्दल माझ्या मनात किंचितही द्वेष नाही. केवळ जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला इतरत्र घरोबा करावा लागत असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष साबणे यांनी रविवारी (ता. ३) येथे दिली आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केले. सोमवारी (ता. ४) येथे होणाऱ्या मेळाव्यात समर्थकांसह साबणे पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती भाजपतर्फे देण्यात आली.

माजी आमदार सुभाष साबणे यांच्या शिवसेना सोडण्याच्या पार्श्वभूमीला गेल्या अनेक वर्षांपासूनची चर्चा सुरू होती. चोहोबाजूने जिल्हा नेतृत्वाने त्यांची कोंडी केली होती. हा सर्व प्रकार शिवसेनेच्या नेतृत्वापर्यंतही गेला होता. मात्र राज्यात आघाडी सरकार असल्याने या प्रकरणाकडे कोणीही गांभीर्याने बघितले नाही, असे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या सूत्रानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात सूनबाईंना उपाध्यक्षपदाची संधी आली होती. जिल्हा नेतृत्वाने जाणीवपूर्वक त्यांना त्या पदापासून दूर लोटल्याचा आरोपही साबणे यांनी यावेळी बोलताना केला. वेळोवेळी समाजकारण, राजकारण करत असताना जिल्हा नेतृत्वाने ‘वरून आघाडी आतून बिघाडी’ करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. अखेर नाइलाजास्तव मुख्य प्रवाहात येण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. त्यामुळे मी भाजपमध्ये जात असल्याचे साबणे यांनी सांगितले.

आधी ठरल्याप्रमाणे झाले!

पक्ष प्रवेशापूर्वीच थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवणारे माजी आमदार सुभाष साबणे हे तसे पहिलेच उदाहरण मानले जात आहे. काहींच्या मते, गेल्या चार महिन्यांपूर्वीच ठरल्याप्रमाणे त्यांना भाजपने तिकीट दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे. आता काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे. कॉंग्रेसने अधिकृत घोषणा केली नसली तरी रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश हेच उमेदवार असतील. वंचित आघाडीतर्फे डॉ. उत्तमराव इंगोले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com