नांदेड : एसटी महामंडळाकडे बस नियोजनाचा अभाव

नादुरुस्त बसचे प्रमाण वाढले; बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाराजी
Nanded ST Corporation bad bus management Increased faulty bus
Nanded ST Corporation bad bus management Increased faulty bussakal

नांदेड : शाळांना सुट्या लागल्यानंतर पालकांनी मुलांसाठी उन्हाळ्याचे नियोजन केले आहे. मुलांच्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी पालकांसमोर बस आणि रेल्व सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मात्र रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनेक दिवसाचे वेटींग लागले असल्याने पालकांनी एसटी महामंडळाच्या बसकडे धाव घेतली खरी, परंतू नादुरुस्त बसची संख्या वाढल्याने प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध करुन देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संध्यातरी महामंडळाकडे उन्हाळी सुट्यांसाठी कुठलेही नियोजन नाही.

कोरोनामुळे मुलांना दोन वर्षापासून घराबाहेर पडली नव्हती. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने व मुलांना देखील उन्हाळी सुट्या लागल्याने पालकांनी मुलांना थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र वेळेवर रेल्वेचे रिझर्वेशन मिळत नसल्याने व महामंडळाकडे बसचे नियोजन नसल्याने पलाकांना खासगी बसकडे मोर्चा वळवाला लागत आहे. सध्या नांदेडच्या मुख्य एसटी आगारातून दिवसाला २६४ बस धावत आहेत. रविवारी (ता.१५) ११ हजार ८६४ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. यातून महामंडळास नऊ लाख ६२ हजार ४२४ रुपये इतके उत्पन्न झाले आहे. त्यामुळे एसटीकडे बसची संख्या वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक

दरवर्षी शाळांना उन्हाळी सुट्या लागताच एसटी महामंडळाकडून स्पेशल बसचे नियोजन करण्यात येते. यंदा देखील अशाच प्रकारचे नियोजन करण्याच्या सुचना वरिष्ठांकडून दिल्या गेल्या आहेत, मात्र नादुरुस्त बस अभावी वरिष्ठांच्या सुचनांचे पालन करण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

लांब पल्याच्या प्रवासाला रेल्वे हा उत्तम पर्याय असतो मात्र आपल्याच भागात प्रेक्षणिय स्थळांना भेट देण्यासाठी एसटी हा एक उत्तम पर्याय आहे. दरवर्षी आम्ही बसने प्रवास करत प्रेक्षणिक स्थळांना भेटी देत असतो. यंदा मात्र पुरेसे नियोजन दिसत नाही. त्यामुळे प्रवासाला जाणे टाळावे लागणार आहे.

- त्र्यंबक कामठेकर, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com