esakal | नांदेड : विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक पोलिस कोठडीत 

बोलून बातमी शोधा

file photo

बाबूराव मोरे या नराधम शिक्षकाने नाव असून त्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईल वरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बाबूराव मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक पोलिस कोठडीत 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुदखेडमधील एका बाक आश्रमातील बलात्काराची घटना ताजी असताना नांदेडात आणखी एका चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास बिलोली न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी बुधवारी (ता. तीन) दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

कुंटूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होती. बाबूराव मोरे असे नराधम शिक्षकाने नाव असून त्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईलवरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बाबूराव मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक हा पीडित मुलीला तुला परीक्षेत चांगले मार्क देतो म्हणून अश्लील चाळे व चॅटिंग करत होता. सदर बाब पीडित मुलीने पालकांना सांगितली. ही बाब समजल्यानंतर पालकांनी गावकऱ्यांसमवेत शाळेत जाऊन सदर शिक्षकास याविषयी जाब विचारला. तेव्हा शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा जमलेल्या लोकांनी शिक्षकाला चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या शिक्षकाला पोलिसांच्या हवाली केले. कुंटूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून विनयभंग, पोस्को आणि ऑट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ-
मुदखेड अत्याचाराच्या घटनेला काही तास देखील उलटले नाहीत. त्यातच नांदेड जिल्ह्यात आणखी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना पुढे आली आहे. जिल्ह्यात मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पूर्वी देखील असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा घटना थांबवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.