नांदेड तहसिलच्या पथकाची वाळू घाटावर कारवाई, २४५ तराफे केले नष्ट

अभय कुळकजाईकर | Monday, 28 December 2020

गोवर्धनघाट, उर्वशीघाट, कौठा, असर्जन, हस्सापूर व कोटतीर्थ नदी घाटावर कारवाई

नांदेड : रविवारी (ता. २७) सकाळीच तहसिल कार्यालयाचे पथक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसिलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार महसूल मुगाजी काकडे यांच्यासोबत गोवर्धनघाट व कौठा नदीपात्रात नदीच्या दोन्ही बाजूने दोन वेगवेगळी पथके बोटीसह नदीत दाखल झाले.

यावेळी पथकात भरपूर कर्मचारी व पुरेसा पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कारवाईस चांगलीच सुरुवात झाली. सदर पथकाने केलेल्या कारवाईत गोवर्धनघाट व उर्वशीघाट येथे ८९ तराफे, कौठा व असर्जन येथे १२२ तराफे व हसापूर व कोटतीर्थ येथे ३४ अशी एकूण २४५ तराफे मजुरांच्या सहाय्याने जाळून नष्ट केले. दोन्ही बाजूने वेगवेवेगळी पथके व नदीमध्ये बोटीवर एक फिरते पथक असल्यामुळे तराफे पळवून नेता आली नाहीत.

हेही वाचा -  -

Advertising
Advertising

सदर कारवाई जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसिलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, बालाजी जेलेवाड, चंद्रकांत कंगळे, अनिल धुळगंडे व अनिरुद्ध जोंधळे तसेच तलाठी मनोज देवणे, सचिन नरवाडे, ईश्वर मंडगीलवार, कैलास सूर्यवंशी, विजय रणवीरकर, रवी पल्लेवाड, विजय अहिरराव व मंगेश वांगीकर महिला तलाठी मीरा चिदगिरे व रेखा राठोड, चालक शेख जहिरोद्दीन यांनी पूर्णत्वास नेली.
 
सदर कारवाईस वजिराबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री रब, ग्रामीणच्या पोलिस उपनिरीक्षक रोहिणी नपते व लिंबगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश घोटके व त्यांच्या कर्मचारी यांनी पुरेसा पोलिस बंदोबस्त देऊन सहकार्य केले. महसूल पथक जरी ग्राम पंचायत निवडणूकीच्या कामात व्यस्त असले वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. 

 

संपादन - प्रल्हाद कांबळे