esakal | नांदेड : सोने विक्रीचे आमिष दाखवून रोख रक्कम लुटली; ठगसेन किनवट पोलिसांच्या कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दराटी तालुका उमरखेड व आमला तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील दोघा भावंडाना फसविण्याच्या उद्देशाने तोतया पोलिसांचा या लुटारु टोळीने वापर केल्याचे तपासात उघडकीस आले असून आणखी अनेक जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नांदेड : सोने विक्रीचे आमिष दाखवून रोख रक्कम लुटली; ठगसेन किनवट पोलिसांच्या कोठडीत

sakal_logo
By
साजिद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : सोने विकण्याचा बहाणा करुन रोख रक्कम घेऊन फसविणाऱ्या टोळीतील माहूर तालुक्यातील लांजी येथील मुख्य आरोपीला किनवट पोलिसांनी अटक केली आहे. खरे सोने असल्याचे सांगून बनावट सोने दाखवून ही टोळी रोख रक्कम लुटत होती. दराटी तालुका उमरखेड व आमला तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील दोघा भावंडाना फसविण्याच्या उद्देशाने तोतया पोलिसांचा या लुटारु टोळीने वापर केल्याचे तपासात उघडकीस आले असून आणखी अनेक जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

माझ्या नातेवाईकाला ३. ७० ग्राम सोने सापडले असून त्याला मार्केटमध्ये विकता येत नसल्याने मी तुम्हाला ते सोने ३ लाख ९० हजार रुपयात देतो असे सांगत लांजी ता. माहूर येथील आकाश दिलीप पवार या ठकसेनाने आपल्या ओळखीतल्या विनोद रामचंद्र इंगोले रा. आमला ता. दिग्रस जि.यवतमाळ येथील व्यक्तीला फोन केला. कमी पैशात इतक्या मोठ्या प्रमाणत सोने मिळत असल्याने लोभात येऊन विनोद याने आपल्या दाराटी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर किनवट शहरालगत असलेल्या पैनगंगा नदीवर भेटण्याचे आरोपी आकाश दिलीप पवार यांनी सांगितलेल्या प्रमाणे ठरले. ठरल्याप्रमाणे ता. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता दोघे भावंडे पोहचले. त्या ठिकाणी या तिघांचे बोलणे सुरु असताना अचानक पोलिस असे लिहून असलेल्या चार चाकी वाहनातून एक महिला व एक पुरुष (तोतया पोलिस) घटनास्थळी येऊन आम्ही तुमच्या मागावरच होतो,असे सांगून विनोद व त्याच्या भावाला काठीने मारहाण केली. तर एक लाख ४० हजार रुपये रोकड असलेली बॅग आरोपी आकाशने हिस्कावून घेतली. भिवून दोघे भाऊ घटनास्थळावरुन पसार झाले. त्या गाडीतली बंटी- बबली याने आकाशला पोलिस लिहलेल्या गाडीत बसवून पोबारा केला. 

हेही वाचा  बोगस बंगाली डॉक्टरवर गुन्हा, चिकलठाणा भागात करत होता मुळव्याधवर उपचार -

घडलेल्या घटनेत आपली फसवणूक झाल्याच्या संशयावरून दोघे भावंडांनी पोलिस ठाणे गाठून घटनेची फिर्याद विनोद रामचंद्र इंगोले याने किनवट पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शाखाली, सपोनी विजय कुमार, फौजदार गणेश पवार, हवालदार आपराव राठोड, चिंटू कागणे यांनी तपासाचे चक्र फिरविले असता आकाशचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्याने मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांनी आकाशचा शोध घेतला व त्याला त्याच्या राहत्या घरातून माहूर पोलिसांच्या सहकार्याने लांजी येथून (ता. २२) रोजी रात्री ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता रोकड असलेली बॅग आकाशच्या घरातून पोलिसांनी हस्तगत केली. आरोपीला बुधवारी (ता. २३) किनवट न्यायालयात हजर केले असता २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस त्या बनावट पोलिस बंटी- बबली जोडीचा शोध घेत आहे. या टोळीने अनेकांना आजवर फसविले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top