नांदेड : कर्मचाऱ्यांच्या तीन दुचाकी पेटवल्या विद्यापीठात माथेफिरूंचा हैदोस

अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे घटनांत वाढ
Nanded Three employees two wheelers burning
Nanded Three employees two wheelers burningsakal

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात अज्ञात माथेफिरुंनी हैदोस घालत शुक्रवारी मध्यरात्री कर्मचाऱ्यांनी पार्किंगमध्ये ठेवलेल्या तीन दुचाकींना आग लावल्याची घटना घडली आहे. तीनही दुचाकी जळून खाक झाल्या असून, हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मोठा परिसर आहे. या परिसरात विविध संकुलासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानाचीही सोय आहे. परंतु पुरेशी सुरक्षा यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्याने गेल्या काही दिवसापासून अज्ञात माथेफिरुंचा विद्यापीठ परिसरात वावर वाढला आहे.

विद्यापीठाचे शेकडो एकर असलेला परिसर आणि त्रोटक सुरक्षा यंत्रणा यामुळे मद्यपी, भुरटे चोर आणि माथेफिरूंना मोकळे रान मिळत आहे. परिणामी येथील कर्मचारी, वाहने व मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याच्या वाहनाचे टायर अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. यानंतर शुक्रवारी मध्यरात्री विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील पार्किंगमध्ये उभे असलेल्या तीन दुचाकी वाहनांना पेटवून दिले. यात दोन स्कुटी व एक दुचाकी जळून खाक झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com