
गुरुवारी ९९७ स्वॅब अहवालापैकी ९११ निगेटिव्ह, ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ४९० वर पोहचली आहे.
नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर स्थिर आहे. गुरुवारी (ता. तीन) प्राप्त अहवालानुसार ५२ रुग्ण कोरोनामुक्त, ४९ जणांचे अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा भरात सध्या ३५२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
बुधवारी (ता. दोन) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी ९९७ स्वॅब अहवालापैकी ९११ निगेटिव्ह, ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ४९० वर पोहचली आहे. गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी गुरुवारी दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५५० इतकी आहे.
हेही वाचा- दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास
१९ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त
गुरुवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - पाच, जिल्हा शासकीय रुग्णालयात - एक, मनपाअंतर्गत एनआरआय भवन - २९
देगलूर - पाच, मुखेड - चार आणि खासगी रुग्णालयातील आठ असे ५२ रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १९ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ३७, नांदेड ग्रामीण - तीन, लोहा - चार, मुखेड - एक, हदगाव - दोन, किनवट - दोन असे ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचले पाहिजे - नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु
३५२ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २० हजार ४९० वर पोहचली आहे. त्यापैकी १९ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त आणि ५५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हाभरात ३५२ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, यापैकी १६ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ४५१ स्वॅबची तपासणी सुरु होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
कोरोना मीटर ः
गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ४९
गुरुवारी कोरोनामुक्त रुग्ण - ५२
गुरुवारी मृत्यू - शून्य
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २० हजार ४९०
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - १९ हजार ३९४
एकूण मृत्यू - ५५०
गंभीर रुग्ण - १६
उपचार सुरू - ३५२
स्वॅब अहवाल येणे बाकी - ४५१