नांदेड : लहान तपोवन बौध्द विहार येथे आज आठ फेब्रुवारीपासून दोन दिवशीय धम्म परिषद

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील लहान येथील निसर्गरम्य माळ टेकडीवर तपोवन बुध्दभूमीत ता. आठ आणि ता. नऊ फेब्रुवारी अशा दोन दिवशीय १८ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला देश- विदेशातील पुज्यनिय भिक्खू उपस्थित राहून धम्मदेसना देणार आहेत. 

बौध्द समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या बावरीनगर महाविहारनंतर, जिल्ह्यातील सर्वात मोठी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद अर्धापूर तालुक्यातील लहान येथील तपोवन बुध्द भुमीत कै. निवृत्तीराव लोणे यांनी सुरु केली होती. त्यांच्या पश्चातही ही अखिल भारतीय स्तरावरील बौध्द धम्म परिषद अजूनही अखंडितपणे भरविली जाते. ता. आठ फेब्रुवारी रोजी येथे १८ वी अ.भा. बौध्द धम्म परिषदेला प्रारंभ होणार असून दोन दिवस चालणाऱ्या धम्म परिषदेला देश विदेशातील विद्वान पुज्यनिय भिक्खू संघ उपस्थित राहून आपल्या धम्मदेसनेतून तथागतांचा धम्म आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र विचार देणार आहेत. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन

ता. आठ फेब्रुवारी रोजी सकाळी भिकू संघ व लहान येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी श्री. लाडके यांच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहन करण्यात येणार आहे. तर दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार असून यावेळी महाउपासक डाॅ.एस. पी. गायकवाड बावरीनगर, दाभड यांची उपस्थिती राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धम्म परिषदेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन

या धम्म परिषदेला पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा, पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो बुद्धगया, पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा, पूज्य भदंत पय्याबोधी नांदेड, पूज्य भदंत पय्यारत्न नांदेड आदी देश- विदेशातील पुज्यनिय विद्वान भिक्खु संघ उपस्थित राहणार आहेत. तर ता. आठ व ता. नऊ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या धम्म परिषदेला जास्तीत जास्त बौध्द उपासक, उपासिका आणि धम्म प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धम्म परिषदेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले आहे. त्याचा लाभ घ्यावा व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आयोजिका अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे, संयोजक संजय लोणे, स्वागताध्यक्ष संजय देशमुख लहानकर यांनी केले आहे.

कोविडमुळे धम्म मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत व पोलिस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत धम्म मिरवणूक व रात्रभर चालणारे धम्मदेशना,सांस्कृतिक आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com